शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

सुईपेक्षा, 'स्प्रे'द्वारे नाकातून लस दिल्यास टळेल कोरोना संक्रमणाचा धोका, तज्ज्ञांचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 3:20 PM

CoronaVirus News : श्वसनाच्या माध्यामातून होत असलेल्या संक्रमणापासून वाचण्यासाठी फुफ्फुसांपर्यंत औषधं पोहोचवणं सगळ्यात उत्तम उपाय ठरू शकतो.

कोरोना व्हायरसची लस तयार करण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत.  कारण  कोरोनामुळे होत असलेल्या मृत्यूंची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नाकातील स्प्रे किंवा इन्हेलर लसीपेक्षा जास्त प्रभावी ठरू शकते. असा दावा ब्रिटनमधील संशोधकांच्या टीमने केला आहे.  ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी आणि इंपीरियल कॉलेज लंडनच्या संशोधकांनी दावा केला आहे की, श्वसनाच्या माध्यामातून होत असलेल्या संक्रमणापासून वाचण्यासाठी फुफ्फुसांपर्यंत औषधं पोहोचवणं सगळ्यात उत्तम उपाय ठरू शकतो. या दोन्ही युनिव्हर्सिटीमध्ये सध्या कोरोनाच्या लसीचे परिक्षण सुरू आहे. 

ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीची लस शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. १० हजारांपेक्षा जास्त लोकांवर या लसीचे परिक्षण केले जाणार आहे. इंपीरियल कॉलेज लंडनच्या लसीच्या वैद्यकिय परिक्षणातील पहिल्या टप्प्यात कोणतेही दुष्परिमाण दिसून आले नाहीत. लसीमुळे नाकातील म्यूकस मेंमरेनची प्रतिकारकशक्ती प्रभावी करता शकते. शरीरातील श्वसनतंत्र आणि फुफ्फुसांवर जसे सुरक्षाकवच असते. 

त्याचप्रमाणे नाकात आणि तोंडावरही असते. त्यामुळे व्हायरसला शरीरात प्रवेश करता येण्यापासून रोखता येऊ शकतं. नाकातून लस दिल्यामुळे म्युकस मेंमब्रेनला अलर्ट देता येऊ शकतो.  जेणेकरून कोरोना व्हायरसला ओळखून आत जाण्यापासून रोखता येईल. नाकातून स्प्रेच्या स्वरूपातून ही लस द्यायला हवी. वयस्कर व्यक्तींसाठी ही लस जास्त परिणामकारक ठरू शकते.

प्रोफेसर रोबिन शेटॉक यांनी दिलेल्या माहितीनुसार इनहेलर किंवा स्प्रेद्वारे दिली जाणारी लस वयस्कर लोकांसाठी जास्त परिणामकारक ठरू शकते. कारण तज्ज्ञांच्यामते  वयस्कर माणसांना सुईच्या माध्यमातून लस दिल्यास परिणामकारक ठरणार नाही. कारण वयाप्रमाणेच रोगप्रतिकारकशक्ती सुद्धा कमी होत जाते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार सुईने लस  देण्याऐवजी स्प्रेच्या माध्यमातून दिल्यास फुफ्फुसांनी निरोगी ठेवता येऊ शकतं.

दरम्यान कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित असलेल्या महाराष्ट्रामध्ये काल कोरोनाच्या तब्बल ४ हजार ८४१ नव्या रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात राज्यात झालेली रुग्णांची ही सर्वाधिक नोंद आहे. गेल्या २४ तासांत देशात कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये पुन्हा एकदा प्रचंड वाढ झाली आहे. काल दिवसभरात देशामध्ये कोरोनाचे तब्बल १७ हजार २९६ नवे रुग्ण सापडले आहे. तर देशभरात ४०७ जणांचा मृत्यू झाला आहे. या सगळ्यात दिलासादायक बाब म्हणजे देशात आतापर्यंत २ लाख ८५ हजार ६३७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 

Coronavirus : वैज्ञानिकांनी सांगितले 'ही' आहेत कोरोनाची दोन मु्ख्य लक्षणे, दिसताच लगेच डॉक्टरांना करा संपर्क!

CoronaVirus: रेल्वे स्टॉलवर आता मास्क, सॅनिटायझर, उशा, बेडरोल आणि टॉवेलही मिळणार

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्स