Corona Vaccine News: Covid vaccine russia may be the first to announce data from final trial | स्पुटनिक-V लसीच्या शेवटच्या चाचणीत रशिया बाजी मारणार?; ४० हजार स्वयंसेवकांना दिली लस

स्पुटनिक-V लसीच्या शेवटच्या चाचणीत रशिया बाजी मारणार?; ४० हजार स्वयंसेवकांना दिली लस

कोरोना व्हयरसची पहिली लस तयार केल्यानंतर आता रशियाच्या या लसीच्या चाचण्याही वेगानं होत आहेत. पहिल्या सहा आठवड्यातील आणि आपल्या लसीच्या  चाचण्यांचे परिणाम रशिया लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे. स्पुटनिक व्ही लस तयार करत असलेली कंपनी गॅमलेया इंस्टिट्यूटचे प्रमुख अलेक्जेंटर गिंट्सबर्ग यांनी रॉयटर्सला याबाबत माहिती दिली आहे. गिंट्सबर्ग यांनी दिलेल्या माहितीनुसार  लस तयार करण्याच्या प्रक्रियेला वेग असणं गरजेचं आहे. पण सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही.

कोरोनाच्या माहामारीत एखादं युद्ध सुरू असल्याप्रमाणे लोकांचा मृत्यू होत आहे. म्हणूनच एक गाईडलाईन तयार करून लस तयार केली आहे. चाचणीदरम्यान नियमांचं पालन केलं असून सुरक्षित असल्याची खात्रीसुद्धा करून घेतली आहे. संपूर्ण जगभरात कोरोना लसीची चाचणी सुरू असून रशिया लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी करत आहे.  सॉवरेन वेल्थ फंडानं ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरपर्यंत लसीचे परिणाम दिसण्याची आशा व्यक्त केली आहे. 

गंभीर साइडइफेक्ट नहीं

अनेक देशांतील लसी या शेवटच्या टप्प्यातील लसीचे परिक्षण पूर्ण करत आहेत. पण  आतापर्यंत शेवटचा निकाल कोणीही जाहीर केलेला नाही. लस तयार करत असलेल्या कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जोपर्यंत लसीच्या सुरक्षिततेबाबत खात्री होत नाही. तोपर्यंत  वाट पाहिली जाणार आहे.  गिंट्सबर्ग यांनी दिलेल्या माहितीनुसार लसीच्या चाचणीबाबत लोकांमध्ये आकर्षण आहे. लोक दीर्घकाळपासून या लसीच्या प्रतिक्षेत आहेत.  लसीचे डोज  दिलेल्या  ४० हजार वॉलेंटिअर्सना १८० दिवसांसाठी निरिक्षणाखाली ठेवण्यात  आलं आहे. आता लसीच्या शेवटच्या चाचणीचे परिणाम आल्यानंतर आंतरराष्ट्रीय पत्रकामध्ये प्रकाशित केलं जाणार आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात या लसीचे कोणतेही साईट इफेक्टस दिसून आलेले नाहीत. 

या लसीच्या पहिल्या चाचणीचे परिणाम वैद्यकिय नियतकालिक लँसेंटमध्ये प्रकाशित करण्यात आले होते. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार जवळपास ४०० लोकांना  ही लस देण्यात आली होती. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार वयस्कर लोकांना लसीकरण अभियानात सहभागी करून घ्यायचं  की नाही याचा निर्णय तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचे निकाल आल्यानंतरच  घेतला जाणार आहे. 

रशियाला मोठं यश, दुसऱ्या कोरोना लशीचंही परीक्षण पूर्ण

रशियातील वृत्तसंस्था RIAने दिलेल्या माहितीनुसार, रशियात दुसऱ्या कोरोना लशीचे मानवी परीक्षण पूर्ण झाले आहे. जगातील पहिली कोरोना लस तयार केल्यानंतर, रशिया आता पुढच्या महिन्यात जगाला पुन्हा एकदा आश्चर्याचा धक्का देण्याच्या तयारीत आहे. रशियन वृत्तसंस्था RIAने आज रशियन ग्राहक सुरक्षा (Russian Consumer Safety) 'Rospotrebnadzor'च्या हवाल्याने सांगितले, "रशियाच्या सायबेरिया व्हेक्टर इंस्टिट्यूटने (Siberia Vector Institute) विकसित केलेल्या दुसऱ्या कोरोना व्हायरस लशीचे मानवी परीक्षण पूर्ण केले आहे. सायबेरिया व्हेक्टर इंस्टिट्यूटने  याच महिन्याच्या सुरुवातीला, या कोरोना लशीचे सुरुवातीच्या टप्प्यावरील अथवा दुसऱ्या टप्प्यावरील परीक्षण पूर्ण झाल्याची माहिती दिली होती.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Corona Vaccine News: Covid vaccine russia may be the first to announce data from final trial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.