Corona Vaccine : काय असते वॅक्सीन? व्हायरसवर अटॅक करण्यासाठी इम्यूनला कशी करते तयार?

By अमित इंगोले | Published: January 16, 2021 12:12 PM2021-01-16T12:12:37+5:302021-01-16T12:13:30+5:30

कधी-कधी इम्यून सिस्टीम स्वाभाविक रूपाने इतकी मजबूत नसते की, कीटाणूंना नष्ट करू शकेल किंवा आजारापासून बचाव करू शकेल. इम्यून सिस्टीमला मजबूत करण्याची एक पद्धत म्हणजे वॅक्सीन आहे.

Corona Vaccine : Know how a vaccine protect human body against infections or disease | Corona Vaccine : काय असते वॅक्सीन? व्हायरसवर अटॅक करण्यासाठी इम्यूनला कशी करते तयार?

Corona Vaccine : काय असते वॅक्सीन? व्हायरसवर अटॅक करण्यासाठी इम्यूनला कशी करते तयार?

googlenewsNext

वॅक्सीन शरीरातील इम्यून सिस्टीमला रोगांसोबत लढण्यासाठी तयार करते. याला इम्यून सिस्टीमसाठी एक ट्रेनिंग कोर्स म्हटलं जाऊ शकतं. अनेकदा वॅक्सीन आपल्या आपल्या इम्यून सिस्टीमच्या नॅच्युरल प्रक्रियेला नुकसानही पोहोचवू शकते. मात्र, सामान्यपणे वॅक्सीनेशन किंवा लसीकरण केलेली व्यक्ती आजारी पडत नाही. चला जाणून घेऊ काय आहे वॅक्सीन आणि ती कशी काम करते...

आपली रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे इम्यून सिस्टीम नैसर्गिकपणे व्हायरस किंवा कीटाणूंपासून आपल्या शरीराची रक्षा करतं. जेव्हा कीटाणू शरीरावर हल्ला करतात तेव्हा आपल्या शरीराचं इम्यून सिस्टीम त्यांच्यासोबत लढण्यासाठी विशेष कोशिका पाठवते. कधी-कधी इम्यून सिस्टीम स्वाभाविक रूपाने इतकी मजबूत नसते की, कीटाणूंना नष्ट करू शकेल किंवा आजारापासून बचाव करू शकेल. इम्यून सिस्टीमला मजबूत करण्याची एक पद्धत म्हणजे वॅक्सीन आहे. (हे पण वाचा : Corona vaccine: एखाद्या वॅक्सीनच्या एफिकेसी रेटचा काय अर्थ होतो? जाणून घ्या काय आहे गणित...)

कशी काम करते वॅक्सीन?

वॅक्सीन एखाद्या कीटाणूचं किंवा व्हायरसचं कमजोर किंवा निष्क्रिय रूप असतं. वॅक्सीनने इम्यून सिस्टीममध्ये व्हायरसची मेमरी तयार होते. म्हणजे इम्यून सिस्टीम त्या व्हायरसला चांगल्याप्रकारे समजून घेते आणि त्याच्यासोबत लढणंही शिकते. जेव्हा त्या व्हायरसचं संक्रमण होतं तेव्हा इम्यून सिस्टीम लगेच सक्रिय होते. इम्यून सिस्टीम व्हायरस, कीटाणू आणि इतर सूक्ष्म जीवांचा सामना करण्यासाठी तयार झालेली असते. ( हे पण वाचा : Co-WIN अ‍ॅपवर रजिस्टर केल्यानंतरच दिली जाणार कोरोनावरील लस, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया....)

गंभीर आजारांपासून बचाव

वॅक्सीन येण्याआधी लहान मुले नेहमीच पोलिओ, देवी, डिप्थीरियासारख्या आजारांचे शिकार होत होते. टिटनेसच्या बॅक्टेरियाने संक्रमित झाल्यावर साधरण खरचटलं तरी ती जीवघेणी ठरू शकते. वॅक्सीनमुळे या समस्या दूर झाल्या आहेत. पोलिओ तर जगातून पूर्णपणे गेला आहे.

 

हर्ड इम्यूनिटीसाठी गरजेची वॅक्सीन

वॅक्सीनेशन अशा लोकांचीही मदत करतं ज्यांना वॅक्सीन दिली जाऊ शकत नाही. जसे की, नवजात बाळ, गर्भवती महिला, गंभीर आजारी व्यक्ती. जेव्हा समाजातील बऱ्याच लोकांना एखाद्या विशेष संक्रामक आजारीची वॅक्सीन दिली जाते, तेव्हा तो आजार एका व्यक्तीतून दुसऱ्या व्यक्ती पसरण्याची शक्यता कमी होते. याप्रकारच्या सामुदायिक सुरक्षेला डॉक्टर हर्ड इम्यूनिटी म्हणतात. (हे पण वाचा : स्मोकिंग करणाऱ्यांपेक्षाही जास्त खराब होऊ शकतात कोरोना रुग्णांची फुफ्फुसं; डॉक्टरांचा दावा)

वॅक्सीनची संपूर्ण प्रक्रिया इम्यून सिस्टीमवर आधारित आहे. अशात हे जाणून घेणं गरजेचं आहे की, एखाद्या बॅक्टेरियाच्या हल्ल्यानंतर स्वाभाविक रूपाने आपलं इम्यून सिस्टीम कसं काम करतं. जेव्हा बॅक्टेरिया किंवा व्हायरस शरीरावर हल्ला करतात तेव्हा लिम्फोसाइट्स नावाची प्रतिरक्षा कोशिका अ‍ॅंटीबॉडीज निर्माण करते. हे प्रोटीने कण असतात. या अ‍ॅंटीबॉडीज शरीरावर हल्ला करणाऱ्या इन्फेक्शनपासून आपला बचाव करतात. ज्याला एंटीजन म्हटलं जातं. सेंटर्स फॉर डिजीज कंट्रोल अ‍ॅन्ड प्रिव्हेंशननुसार, एका निरोगी व्यक्ती दिवसभरात लाखो अ‍ॅंटीबॉडीज प्रोड्यूस करू शकतो. या अ‍ॅंटीबॉडीज इन्फेक्शनसोबत इतक्या वेगाने लढतात की, अनेकदा व्यक्तीला हे कळतही नाही की, ते एखाद्या इन्फेक्शनच्या संपर्कात आले होते किंवा नाही.

वाय आकाराच्या अ‍ॅंटीबॉडीज विशेष अ‍ॅंटीजनवर काम करतात. जेव्हा त्यांना अशा बॅक्टेरियाबाबत समजतं ज्यांचा ते आधीच सामना केलेले असतात अशांसोबत अ‍ॅंटीबॉडी लढत असतात. यांची दोन कामे आहेत. एकतर अ‍ॅंटीजनला रोखून ठेवणं जेणेकरून बॅक्टेरिया कमजोर केला जाऊ शकेल आणि त्याने शरीराला कमीत कमी नुकसान पोहोचवावं. दुसरं काम म्हणजे रोगप्रतिकारकशक्ती कोशिकांना संक्रमणाचा संकेत देणं. या इतर कोशिका बॅक्टेरियाला नष्ट करून शरीरातून काढून टाकतात. जेव्हा शरीर एखाद्या नव्या बॅक्टेरिया किंवा व्हायरसचा सामना करतं तेव्हा या पूर्ण प्रक्रियेला अनेक दिवस लागतात.

दुसऱ्यांदा रोग होण्याचा धोका कमी

आजारांविरोधात लढणाऱ्या या सुरक्षेला इम्यूनिटी म्हटलं जातं. संक्रमणाच्या माध्यमातूनही शरीरात इम्यूनिटी तयार होते. उदाहरण द्यायचं तर जी व्यक्ती इबोला संक्रमणातून बरी झाले असेल, त्या व्यक्तीला तोच आजार पुन्हा होणार नाही. कोरोना व्हायरसचे पुन्हा संक्रमणाच्या अनेक केसेस समोर आल्या आहेत. यावर एक्सपर्ट सांगतात की, दुसऱ्यांदा झालेलं संक्रमण पहिल्यांदा झालेल्या संक्रमणा इतकं घातक नाही.
 

Web Title: Corona Vaccine : Know how a vaccine protect human body against infections or disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.