शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

CoronaVaccine : मस्तच! आता तर कोविशील्ड लस घेतलेल्यांची चिंताच मिटली! नव्या अभ्यासातून समोर आली आनंदाची बातमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 16:48 IST

Corona Vaccine : सध्या जगभरात, कोरोनाच्या विविध लसी आणि त्यांच्या परिणामांसंदर्भात जबरदस्त चर्चा सुरू आहे.

नवी दिल्ली - कोरोनाचा सामना करण्यासाठी जगभरात मोठ्या प्रमाणावर लसीकरण केले जात आहे. यातच, विविध लसी आणि त्यांच्या परिणामांचीही जबरदस्त चर्चेत आहेत. नुकतेच, भारतात आयोजित ब्रिजिंग फेज 2/3 च्या चाचणीनुसार, ऑक्सफोर्ड-एस्ट्राझेनेका (AZD1222) लसीचे लोकल व्हर्जन हे कोरोना विषाणूविरोधात कोविशील्ड, AZD1222 च्यातुलनेत सारखीच प्रतिकारशक्ती निर्माण करते, असे आढळून आले आहे. याचाच अर्थ, भारताची कोविशील्ड लस ही ऑक्सफोर्डच्या एस्ट्राजेनेका सारखीच इम्युनिटी देते. तथापि, या चाचणीचे परिणाम हे एका प्री-प्रिंट अभ्यासाचा भाग असून, त्यांचा रिव्ह्यू अद्याप बाकी आहे. (Corona Vaccine India's covishield gives immunity at par with oxford s astrazeneca says study)

अॅस्ट्राझेनेकाकडून तंत्रज्ञान मिळाल्यानंतर पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (एसआयआय) तयार केलेल्या कोविशील्डला भारतात 2/3 इम्युनो-ब्रिजिंग अभ्यासात इव्हॅलुएट करण्यात आले होते. AZD1222 च्या तुलनेत कोविशील्डमध्ये  एक नॉन इंफीरियर इम्यून रिस्पॉन्स आहे.

25 ऑगस्ट ते 31 ऑक्टोबर 2020 दरम्यान 1601 स्वयंसेवकांवर अभ्यास करण्यात आला होता. यानंतर, ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) नॅशनल ड्रग रेग्युलेटरच्या विषय तज्ज्ञ समितीने मंजुरीची शिफारस केल्यानंतर, या वर्षी 3 जानेवारी रोजी कोविशील्डला आपत्कालीन मंजुरी देण्यात आली.

आपल्याला टोचली जाणारी कोरोना लस खरी आहे की खोटी, कसं ओळखायचं? जाणून घ्या...

यातच, अनेक ठिकाणी बनावट लस दिली जात असल्याच्या बातम्याही आल्या. आंतरराष्ट्रीय बाजारातही बनावट लसींच्या धंद्याचा खुलासा झाला. अलीकडेच, आग्नेय आशिया आणि आफ्रिकेत बनावट कोविडशील्डच्या लसी सापडल्या. यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने बनावट लसींपासून सावध राहण्याचा इशाराही दिला होता. याच संदर्भात आता केंद्र सरकारने राज्यांना, असे अनेक स्टॅंडर्ड्स (मानके) सांगितली आहेत, ज्याच्या आधारे आपल्याला दिली जात असलेली लस खरी आहे की बनावट हे समजू शकेल.

Corona Vaccine : टेन्शन वाढलं! फक्त 6 महिन्यांतच संपतोय 'या' कोरोना लसीचा प्रभाव; नव्या संशोधनाचा मोठा दावा  

खरी लस ओळखता यावी, यासाठी केंद्राने सर्व आवश्यक माहिती राज्यांना दिली आहे. यावरून, लस पाहताच ती खरी आहे, की बनावट हे ओळखता येईल. लस खरी आहे, की बनावट हे ओळखण्यासाठी कोविशील्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पूतनिक-व्ही, या तिन्ही लसींवरील लेबल, त्यांचा कलर, ब्रँडचे नाव यासंदर्भात संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस