Corona Vaccine : टेन्शन वाढलं! फक्त 6 महिन्यांतच संपतोय 'या' कोरोना लसीचा प्रभाव; नव्या संशोधनाचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 16:41 IST2021-09-06T16:40:39+5:302021-09-06T16:41:04+5:30
अमेरिकेतील केस वेस्टर्न रिझर्व्ह युनिव्हर्सिटी आणि ब्राऊन युनिव्हर्सिटीच्या नेतृत्वाखाली झालेल्या या अध्ययनात, नर्सिंग होमच्या 120 लोकांच्या आणि 92 आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांच्या रक्ताच्या नमुन्यांचा अभ्यास करण्यात आला.

Corona Vaccine : टेन्शन वाढलं! फक्त 6 महिन्यांतच संपतोय 'या' कोरोना लसीचा प्रभाव; नव्या संशोधनाचा मोठा दावा
कोरोनाच्या वेगवेगळ्या लसींसंदर्भात अनेक अहवाल समोर आले आहेत, ज्यांत लसीचा प्रभाव किती काळ असेल हे सांगण्यात आले आहे. आता फायझर लसीसंदर्भात असेच एक अध्ययन समोर आले आहे. फायझर लस टोचून सहा महिने झाल्यानंतरच कोरोना अॅन्टीबॉडीज 80 टक्क्यांपेक्षाही कमी झाल्याचे, अमेरिकेच्या एका अध्ययनातून समोर आले आहे. (Corona Vaccine America study finds antibodies reduced in six months of taking pfizer supplements)
फायझर लसीचे दोन्ही डोस घेऊन सहा महिने झाल्यानंतर अँटीबॉडीज 80 टक्क्यांपेक्षा कमी झाल्या. अमेरिकेतील केस वेस्टर्न रिझर्व्ह युनिव्हर्सिटी आणि ब्राऊन युनिव्हर्सिटीच्या नेतृत्वाखाली झालेल्या या अध्ययनात, नर्सिंग होमच्या 120 लोकांच्या आणि 92 आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांच्या रक्ताच्या नमुन्यांचा अभ्यास करण्यात आला.
आपल्याला टोचली जाणारी कोरोना लस खरी आहे की खोटी, कसं ओळखायचं? खुद्द सरकारनंच सांगितलं
या अध्ययनात संशोधकांनी विशेषतः ह्यूमोरलर इम्यूनिटीचे अध्यन केले. याला अँटीबॉडी-मध्यस्थ प्रतिकारशक्तीही म्हटले जाते. याचा उद्देश, कोविड-19 ला कारणीभूत ठरणाऱ्या सार्स-सीओव्ही-2 व्हायरसविरोधातील शरीराची सुरक्षितता मोजणे, असा होता. हा अध्ययन अहवाल अद्याप प्रसिद्ध झालेला नाही. मात्र, तो प्रीप्रिंट सर्व्हर मेडआर्काइव्हवर पोस्ट करण्यात आला आहे. या अध्यनातून सहा महिन्यानंतर लोकांच्या अँटीबॉडीजचा स्तर 80 टक्क्यांहून अधिक कमी झाल्याचे समोर आले आहे.
अहवालानुसार, सरासरी 76 वर्ष वय असणारे वरिष्ठ नागरीक आणि सरासही 48 वर्षांच्या लोकांवरील प्रभाव समान होता. केस वेस्टर्न रिझर्व्ह युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर डेव्हिड कॅनेडे यांनी म्हटले, लसीकरणाच्या सहा महिन्यांनंतर, नर्सिंग होममधील 70 टक्के लोकांच्या रक्तात प्रयोगशाळेच्या प्रयोगांत कोरोना व्हायरस संक्रमणाला निष्प्रभ करण्याची क्षमता अत्यंत कमी होती. कॅनेडे म्हणाले, हा रिझल्ट बुस्टर डोस घेण्याच्या शिफारसीचे समर्थन करतो. विशेष करून वृद्धांसाठी.