Corona New Symptoms: समोर आली डोळे आणि केसांसंबंधी कोरोनाची २ नवी लक्षणं, तुम्हीही करा चेक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2022 05:56 PM2022-01-01T17:56:11+5:302022-01-01T17:57:23+5:30

Corona Virus New Symptoms : ब्रिटनमध्ये गेल्या एका आठवड्यात कोरोना संक्रमितांची संख्या वाढून २ लाख ३० हजार पार झाली आहे. इतरही काही देशांसोबत भारतातही कोरोनाच्या केसेस दिवसेंदिवस वाढत आहेत. 

Corona New Symptoms : Red eyes and rapid hair loss may be symptoms of corona | Corona New Symptoms: समोर आली डोळे आणि केसांसंबंधी कोरोनाची २ नवी लक्षणं, तुम्हीही करा चेक

Corona New Symptoms: समोर आली डोळे आणि केसांसंबंधी कोरोनाची २ नवी लक्षणं, तुम्हीही करा चेक

Next

जगभरात कोरोना व्हायरसच्या (Corona Virus) नव्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे (Omicron Variant) केसेस वेगाने वाढत आहेत. ब्रिटनमध्ये गेल्या एका आठवड्यात कोरोना संक्रमितांची संख्या वाढून २ लाख ३० हजार पार झाली आहे. इतरही काही देशांसोबत भारतातही कोरोनाच्या केसेस दिवसेंदिवस वाढत आहेत. 

'डेली स्टार' वेबसाइटनुसार, ब्रिटनमधील परिस्थिती ही आहे की, रोज कोरोनाच्या हजारो केसेस समोर येत आहेत. इथे कोरोनाचं नवं व्हेरिएंट ओमायक्रॉनने पूर्ण ब्रिटनला आपल्या वेढलं आहे. ज्या लोकांना कोरोनाची लागण झाली त्यांच्यात कोणत्याही प्रकारची गंभीर लक्षणे (Corona Symptoms) समोर येत नाहीयेत. तर काहींना ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास आणि गंध जाणे अशी लक्षणे दिसत आहेत.

समोर आली दोन नवीन लक्षणे

अशातच डॉक्टरांनी कोरोनाच्या काही नव्या लक्षणांबाबत माहिती दिली आहे. ज्यांबाबत लोकांना फार जास्त माहिती नाही. यात डोळे लाल होणे किंवा वेगाने केसगळती यांचा समावेश आहे.

असं मानलं जात आहे की, कोरोना व्हायरस Angiotensin-Converting Enzyme 2 (ACE2) नावाच्या एंजाइमच्या माध्यमातून लोकांच्या कोशिकांमध्ये प्रवेश करतो. असा अंदाज आहे की, हा व्हायरस  डोळ्यांच्या माध्यमातूनही शरीरात एन्ट्री करू शकतो. डॉक्टरांचं मत आहे की, जेव्हा ACE2 एंजाइमच्या माध्यमातून कोरोना शरीरावर हल्ला करतो तेव्हा लोकांना वाटतं की, हा सामान्य व्हायरल अटॅक आहे.

डोळ्यांवर अटॅक करतो व्हायरस

रिपोर्टनुसार, डोळ्यांमध्ये शिरल्यानंतर कोरोना व्हायरस रेटिना आणि epithelial सेलवर अटॅक करतो. हे दोन्ही सेल डोळे आणि पापण्यांच्या भागांना पांढरं करण्याचं काम करतात. डॉक्टरांचं मत आहे की, जेव्हा कोरोना व्हायरस डोळ्यांवर अटॅक करतो तेव्हा केवळ डोळे लाल होतात असं नाही तर त्यात सूज, पाणी वाहणं, वेदनाही होऊ लागतात. कोरोनाच्या या नव्या लक्षणावर रिसर्च सुरू आहे. अमेरिकन अकॅडमी ऑफ डर्मोटॉलॉजी एसोसिएशनचं मत आहे की, हे लक्षण तापामुळेही दिसू शकतं. 

केसगळती वाढते

डॉक्टर म्हणाले की, कोरोनाचं दुसरं लक्षण केसगळतीत वाढ होणे हे आहे. सामान्यपणे ताप किंवा आजारपणामुळे २ ते ३ महिन्यांपर्यंत केसगळती होत असते. पण जर तुम्ही निरोगी-फिट आहात तरीही तुमचे केस गळत असतील तर तुम्ही कोरोना संक्रमित असू शकता. अशात वेळीच कोरोनाची टेस्ट करून घ्यावी. उपचारानंतर  ६ ते ९ महिन्यांच्या आत केसगळती थांबते.
 

Web Title: Corona New Symptoms : Red eyes and rapid hair loss may be symptoms of corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.