शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

साध्या डुलकीपेक्षा ‘कॉफी नॅप’ भारी, आळस उडून येईल तरतरी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 16:36 IST

आता तर दुपारचे फक्त बाराच वाजलेत. लंच टाईमला अजून दीड तास अवकाश आहे आणि डोळ्यावरची झापड काही केल्या जात नाहीये. डोळ्यावर पाणी मारलं तरीही, जागेवरून उठून थोडं चालून आलं तरीही.

आता तर दुपारचे फक्त बाराच वाजलेत. लंच टाईमला अजून दीड तास अवकाश आहे आणि डोळ्यावरची झापड काही केल्या जात नाहीये. डोळ्यावर पाणी मारलं तरीही, जागेवरून उठून थोडं चालून आलं तरीही. दुपारी दोन वाजता महत्त्वाची मिटींगही अटेंड करायची आहे. अशात या डुलकीने मेंदूला पार झोपवून टाकलंय.. थोडी डुलकी घेतली तरी प्रत्येक वेळी ताजंतवानं वाटेलच असंही नसतं. नंतरही बरेचदा झाकोळून आल्यासारखं वाटत राहतं.

आॅफिसमध्ये आल्यानंतर काही वेळानं डोळ्यावर येणारी झापड वा डुलकी ही अनेकांना भेडसावणारी समस्या असते. कधीकधी तर ती दिवसभर छळत राहते. पाचच मिनिटं कुठं डोळे मिटून झोपता आलं तर.. ची स्वप्ने पाहण्यातच दिवस सरतो. बहुतेकजण अशावेळी चहा किंवा कॉफी घेतात. पण त्याने होतं उलटंच. झोप अधिकच तीव्र होत जाते. हा सगळा खेळ असतो मेंदूमधील रासायनिक क्रियांचा. जेव्हा डुलकीच्या अधीन असताना आपण चहा किंवा कॉफी घेतो तेव्हा ते लहान आतड्याकडून शोषून घेतलं जातं व नंतर रक्तवाहिन्यांमध्ये पोहचतं. काही वेळात ते तुमच्या मेंदूत पोहचून मेंदूतील अ‍ॅडेनोसिनने युक्त अशा रिसेप्टर्सला जाऊन धडकतं. हे अ‍ॅडेनोसिन एक प्रकारचे न्यूरोट्रान्समीटर्स असतात जे तुम्हाला असं झोपाळूपणाचं फिलींग देत असतात. हे फिलिंग म्हणजे खरंतर एक प्रकारचं बायप्रॉडक्टंच असतं. जेव्हा तुम्ही कुठलंही एनर्जी ड्रिंक घेता तेव्हा ते या अ‍ॅडेनोसिनला घेरून घेतं. परिणामी तुम्हाला गळाल्यासारखं, थकल्यासारखं किंवा थोड्यावेळ तरी झोपावंसं वाटू लागतं. आठवा, गोड खाल्ल्यानंतर डोळ्यावर झापड येते नां?

आता यावरच्या उपायाकडे वळू. जेव्हा तुम्हाला डुलकी आल्यासारखं नुकतंच वाटू लागतं. एखादी डुलकी घेण्याच्या अगदी सुरुवातीला म्हणजे २० मिनिटे आधी तुम्ही कॉफी घ्या. ही वेळ तुम्हाला तुमची शोधून काढता येऊ शकते. पहिली जांभई ही त्याची एक खूण असते. त्या वेळेच्या आधी कॉफी घेतल्याने तुम्ही एक प्रकारे तुमच्या मेंदूची फसगत करत असता. मेंदूतल्या झोपेच्या यंत्रणेला तुमच्या बाजूने काम करायला भाग पाडत असता. या आधीच घेतलेल्या कॉफीमुळे तुमच्या मेंदूला तरतरीत अवस्थेतच झोपेचे फिलिंग येते. ती झोप किंवा डुलकीची गरज पूर्ण होते जेव्हा तुम्हाला तुमच्या महत्त्वाच्या कामासाठी सज्ज व्हायचे असते. ही डुलकी अ‍ॅडोनोसिनला बाजूला सारते आणि तुमचा मेंदू पुन्हा तल्लख होतो.

अर्थात या कॉफी नॅप प्रयोगाची प्रक्रिया मेंदूत कसकशी घडते ते तिथे जाऊन पाहण्याचा कुठला मार्ग नाही. मात्र संशोधकांनी या कॉफी नॅपचा चांगला उपयोग होत असल्यावर एकमत नोंदवलं आहे.

ठरावीक वेळेला दुपारची डुलकी आणि नंतर चहा किंवा कॉफी असं समीकरण न ठेवता, आधी चहा किंवा कॉफी मग डुलकी असं करून बघा. कदाचित तुम्हालाही त्या आॅफिसात नकोशा वाटणाऱ्या डुलकी द्वंद्वातून सुटका करून घेता येईल. मग तुम्हालाही वाटेल, साध्या डुलकीपेक्षा कॉफी नॅप बरी.

टॅग्स :Healthआरोग्य