(Image Credit : www.healthline.com)

वजन वाढण्याची समस्या ही प्रत्येकाचं टेन्शन वाढवणारी समस्या आहे. कारण वजन कमी करणं फारच कठीण काम आहे. वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय शोधत असतात. वजन कमी करण्याची सर्वात चांगली पद्धत म्हणजे डाएट कंट्रोल आणि फिजिकली अ‍ॅक्टिव राहणे. यासोबतच आणखीही काही अशा गोष्टी आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही वजन कमी करू शकता.

कोको पावडर पावडरपासून अनेक स्वादिष्ट पदार्थ तयार केले जातात आणि या पदार्थांमुळे वजन कमी होतं. जर कोको पावडरचा योग्य पद्धतीने वापर केला तर तुमचं वजन कमी करू शकतं. कोको पावडर आणि चॉकलेटला लोक एकच पदार्थ समजतात. पण दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत.

(Image Credit : massa-muscular.com)

कोकोच्या बियांपासून कोको पावडर तयार केलं जातं. हे केवळ पावडर असतं आणि यात फॅट व शुगर नसते. तेच चॉकलेटमध्ये शुगर, कोको बटरसारख्या गोष्टी असतात. ज्यामुळे फॅट वाढतं.  चॉकलेटमध्ये कोको पावडरचं प्रमाण जेवढं जास्त असेल तेवढं चांगलं मानलं जातं.

(Image Credit : healthline.com)

तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, फिटनेस वर्कआउटआधी ट्रेनर्स चॉकलेट ड्रिंक्स सुद्धा देतात. कारण कोकोमुळे तुमचं मेटाबॉलिज्म वेगवान होतं. त्यामुळे फॅटही वेगाने मेटाबोलाइज होतं.

कोको पावडरचा दुसरा फायदा असाही होतो की, तुमचं ब्लड प्रेशर कमी होतं. डार्क चॉकलेट असो वा कोको पावडर दोन्हींचं ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत करतात. असेही मानले जाते की, कोकोमध्ये जे फ्लेवेनॉइड्स असतात ते ब्लडमध्ये नायट्रिक ऑक्साइडचं प्रमाण वाढवतं.

(Image Credit : www.medicalnewstoday.com)

ब्लड प्रेशर कमी करण्यासोबच कोकोमध्ये आणखीही काही असे गुण असतात ज्यांमुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचाही धोका कमी होतो. अनेक रिसर्चमधून हे समोर आले आहे की, कोकोमध्ये असेही काही गुण आहेत, ज्यांमुळे तुमचा मूड चांगला होऊन डिप्रेशन कमी केलं जातं. 

एकूण काय तर कोको आणि कोकोचे पदार्थ वजन कमी करण्यासोबतच आरोग्यासाठीही चांगले असतात. पण याचं सेवन योग्य प्रमाणात केलं गेलं तरच याचा फायदा होतो.

Web Title: Cocoa powder is helpful in weight loss, know how

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.