Weight loss tips: स्वयंपाकघरातील 'हा' मसाला पोटावरची चरबी कमी करतो झटपट, फक्त 'या' प्रकारे करा उपयोग
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 17:50 IST2022-05-10T17:50:49+5:302022-05-10T17:50:58+5:30
आम्ही तुमच्यासाठी एक असा उपाय घेऊन आलो आहोत ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. हा उपायही काही कठीण आणि महागडा नाही. अगदी घरच्याघरी उपलब्ध असणारा अन् सोप्या पद्धतीने उपयोग करता येऊ असणारा पदार्थ म्हणजे खरंतर एक मसाला आहे.

Weight loss tips: स्वयंपाकघरातील 'हा' मसाला पोटावरची चरबी कमी करतो झटपट, फक्त 'या' प्रकारे करा उपयोग
कोरोनाकाळात लोकांचे वजन चांगलेच वाढले आहे. काहीवेळा ते कमी करण्यासाठी कित्येक उपाय केले जातात. पण तरीही काही फायदा होत नाही. विशेषत: पोटावरची चरबी कमी करणं अनेकांना कठीण जाते. अशावेळी आम्ही तुमच्यासाठी एक असा उपाय घेऊन आलो आहोत ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. हा उपायही काही कठीण आणि महागडा नाही. अगदी घरच्याघरी उपलब्ध असणारा अन् सोप्या पद्धतीने उपयोग करता येऊ असणारा पदार्थ म्हणजे खरंतर एक मसाला आहे.
लवंग म्हटली की ती जेवढा चहाचा स्वाद वाढवते त्याहुनही कित्येक पटीने मोठा पदार्थ मानला जाणाऱ्या बिर्याणीचाही स्वाद वाढवते. या लवंगेचा उपयोग करुन तुम्ही पोटाची चरबी कशी कमी करु शकता हे जाणून घेऊ. त्याआधी लवंग या मसाल्यातील गुणधर्म जाणून घेऊ.
लवंगीचे गुणधर्म
नखाएवढ्या दिसणाऱ्या या छोट्याश्या मसाल्यात व्हिटॅमीन ए, व्हिटॅमीन सी, व्हिटॅमिन के, प्रोटीन, कार्बोहायट्रेड्स, फोलेट और डाएटरी फायबर आदी गुणधर्म असतात. यामुळे मेटाबॉलिज्म बुस्ट होते. यामुळे आपल्या शरीरातील चर्बी विरघळू लागते परिणामी वजन कमी होते.
कसा करावा उपयोग
लवंग, जीरे दालचिनी समप्रमाणात घ्यावे. त्याची पुड करावी. चमचाभर पुड पाण्यात मिसळावी. त्यात एक चमचा मध मिसळावे. हे सर्व मिश्रण नीट उकळुन घ्यावे. हे पाणी सकाळी उपाशी पोटी प्यावे. पोटाची चरबी मेणासारखी विरघळेल.