दिलासादायक! किटकांच्या पेशींपासून कोरोनाची लस तयार होणार; मानवी चाचणीला मंजूरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2020 17:14 IST2020-08-24T17:06:34+5:302020-08-24T17:14:50+5:30
CoronaVirus News & Latest Updates : ही लस तयार करण्यासाठी किटकांच्या पेशींचा वापर करण्यात आला आहे. या लसीच्या मानवी परिक्षणासाठी परवानगीदेखील मिळाली आहे.

दिलासादायक! किटकांच्या पेशींपासून कोरोनाची लस तयार होणार; मानवी चाचणीला मंजूरी
जगभरात कोरोनाची लस तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अनेक लसी चाचणीच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचल्या आहेत. लसीच्या शर्यतीत भारत, ब्रिटन, अमेरिका आणि रशिया, चीन हे देश पुढे आहेत. दरम्यान चीनमध्ये आता वेगळ्या प्रकारची लस तयार केली जात आहे. ही लस तयार करण्यासाठी किटकांच्या पेशींचा वापर करण्यात आला आहे. या लसीच्या मानवी परिक्षणासाठी परवानगीदेखील मिळाली आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सनं दिलेल्या माहितीनुसार चंगडू शहरातील स्थानिक प्रशासनानं या लसीबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या माहामारीबाबत चंगडू शहराच्या प्रशासनानं सोशल मीडियावर वी चॅटवर एक नवीन नोटीस दिली आहे. यानुसार लसीसाठी किडकांच्या पेशींमधील प्रोटीन्सचा वापर केला जात आहे. या लसीला चंगडू सिचुआन युनिव्हर्सिटीच्या रुग्णालयात तयार करण्यात आले आहे. चंगडू प्रशासनाने दिलेल्या नोटीसनुसार या लसीसाठी नॅशलन मेडिकल प्रोडक्ट्स एडमिनिस्ट्रेशनकडून वैद्यकीय परिक्षणासाठी मंजूरी मिळाली आहे.
चीनची ही पहिली लस आहे जी किड्यापासून तयार केली जाणार आहे. माकडांवरील परिक्षणादरम्यान दिसून आलं की, कोणत्याही दुष्परिणामांशिवाय कोविड १९ पासून बचाव झाला आहे.चीनमधील तज्ज्ञ कोरोनाच्या कमीत कमी ८ लसींवर काम करत आहेत. वेगवेगवळ्या पद्धतीने लसीचे ट्रायल सुरू आहे. चीनमध्ये काही निवडक कंपन्यांनी मिळून तयार केलेल्या दोन लसींना आपत्कालीन परिस्थितीत वापर करण्याची मंजुरी मिळाली असल्याची माहिती चीनमधील आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.
दरम्यान संक्रमणाचा धोका ज्या व्यक्तींना सर्वात जास्त आहे अशा रुग्णांवर याचा वापर करता येणार आहे. मेडिकल कन्सेन्ट फॉर्म, साईड इफेक्ट्स मॉनिटर करण्याचा प्लॅन तयार करण्यात आला आहे. चीनच्या कोरोना व्हायरस लसीकरण विकास टास्क फोर्सचे प्रमुख झेंग झॉन्गवी यांनी सरकारी सीसीटीव्हीला दिलेल्या माहितीनुसार, वैद्यकीय नियम पाळून ही लस दिली जाणार आहे. लस दिल्यानंतर रुग्णांची निरीक्षणं नोंदवण्यात येणार असून त्यांच्या आरोग्याची देखील काळजी घेण्यात येईल. या लशीचे होणारे दुष्परिणाम आणि नुकसान याचा विचार करून एक विशेष पॅकेज तयार करण्यात आलं आहे.
चीनमधील दोन्ही लसींना फक्त आपत्कालीन स्थितीत वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी येत्या काही दिवसांत खूप लोकांना ही लस देण्यावर अधिक भर असल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. फूड मार्केट, ट्रान्सपोर्ट सिस्टम आणि सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या लोकांपर्यंत कोरोनाची लस पोहोचवण्याचं काम केलं जाईल असंही सांगितलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 23,583,616 वर पोहोचली आहे. तर 812,513 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर तब्बल 16,080,573 लोकांनी कोरोनावर मात करून कोरोनाविरुद्धचं युद्ध जिंकले आहे.
हे पण वाचा-
चिंताजनक! कोरोना लसीसाठी 'असा' शॉर्टकट वापरल्यास संपूर्ण जगाचा जीव धोक्यात येणार
Coronavirus: कोरोना लस ७३ दिवसांत आणि मोफत शक्य नाही; सिरम इन्स्टिट्यूटचं स्पष्टीकरण