लहान मुलांच्या आरोग्याबाबत रिसर्चमधून खुलासा, पालकांनी वेळीच व्हावं सावध!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2024 15:59 IST2024-04-17T15:58:45+5:302024-04-17T15:59:11+5:30
बार्सिलोना विश्वविद्यालयातील अभ्यासकांनी 2 ते 12 वयोगटातील 1,133 मुलाच्या झोपेच्या सवयी आणि फोन बघण्यासोबतच त्यांची डाएट व बॉडी मास इंडेक्सवर रिसर्च केला.

लहान मुलांच्या आरोग्याबाबत रिसर्चमधून खुलासा, पालकांनी वेळीच व्हावं सावध!
Obesity cause : लठ्ठपणाची समस्या आजकाल जगभरात भेडसावत आहे. मोठ्यांसोबतच लहान मुलेही याचे शिकार होत आहेत. लठ्ठपणाची वेगवगळी कारणे सांगितली जातात. अशात एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, जी मुले झोपण्याआधी अर्धा तासांपेक्षा मोबाइल बघतात आणि रात्री 10 वाजतानंतर झोपतात त्यांना लठ्ठपणाचा धोका अधिक असतो.
बार्सिलोना विश्वविद्यालयातील अभ्यासकांनी 2 ते 12 वयोगटातील 1,133 मुलाच्या झोपेच्या सवयी आणि फोन बघण्यासोबतच त्यांची डाएट व बॉडी मास इंडेक्सवर रिसर्च केला.
रिसर्चमध्ये असं आढळून आलं की, प्रीस्कूलच्या एक चतुर्थांशपेक्षा अधिक मुले आणि शाळेत जाणाच्या वयातील एक तृतीयांश मुले बेडवर जाण्याआधी स्क्रीनसमोर अर्ध्या तासांपेक्षा वेळ घालवतात. अभ्यासक म्हणाले की, जी मुलं झोपण्याआधी स्क्रीन समोर जास्त वेळ घालवतात. त्यांना लवकर झोपणाऱ्या मुलांच्या तुलनेत लठ्ठपणाचा धोका अधिक असतो.
अभ्यासकांच्या टीमला आढळलं की, रात्री 10 वाजतानंतर बेडवर जाण्याआधी आणि झोपण्याआधी स्क्रीनचा वापर केल्याने प्रीस्कूल आणि शाळकरी मुलांचा दोघांचा झोपण्याचा वेळ कमी झाला आहे आणि ज्यामुळे झोपेच्या गुणवत्तेवर प्रभाव पडत आहे. रिसर्चमध्ये आढळून आलं की, या सवयीमुळे शाळकरी मुला-मुलींची शारीरिक रूपाने सक्रियता कमी होती.
अभ्यासकांचं मत आहे की, रात्री उशीरा झोपणाऱ्या लोकांची झोप कमी होते, ज्यामुळे ते आठवडाभर पुरेशी झोप घेऊ शकत नाहीत. ज्यामुळे त्यांची चिडचिड वाढते. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा सल्ला आहे की, दोन वर्षापेक्षा कमी वयाच्या लहान मुलांनी स्क्रीन वापर अजिबात करू नये. तर दोन वर्षाच्या मुलांनी दररोज एक तासापेक्षा अधिक स्क्रीनचा वापर करू नये.
सामान्यपणे कोविड महामारीनंतर लहान मुलांचा स्क्रीन टाइम जास्त वाढला आहे. बीबीसीच्या एका सर्वेक्षणात आढळलं होतं की, 79 टक्के आई-वडील या गोष्टीमुळे चिंतेत होते की, त्यांची मुलं स्मार्टफोन, टॅबलेट आणि इतर डिवाइसवर जास्त वेळ घालवतात.