लगेच चेक करा हात आणि पायांची नखं, आकार-रंगात बदल आहे लिव्हर डॅमेजचा संकेत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 12:12 IST2025-01-23T12:10:56+5:302025-01-23T12:12:20+5:30
Liver Damage Sign : तशी तर लिव्हरमध्ये स्वत:ला हेल्दी ठेवण्याची क्षमता असते. पण जर तुमची लाइफस्टाईल चुकीची असेल तर तुमचं लिव्हर जास्त दिवस स्वत:ला वाचवू शकत नाही.

लगेच चेक करा हात आणि पायांची नखं, आकार-रंगात बदल आहे लिव्हर डॅमेजचा संकेत!
Liver Damage Sign : लिव्हर डॅमेज झालं तर स्थिती फार गंभीर होऊ शकते. लिव्हर डॅमेज झाल्यावर शरीरातील इतरही अवयव प्रभावित होतात. आजकाल लिव्हर डॅमेजची समस्या मोठी गंभीर झाली आहे. लिव्हर हे शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. लिव्हरच्या माध्यमातून शरीरातील विषारी तत्व बाहेर काढले जातात. सोबतच यानं ऑर्गन डायजेशन, गुड कोलेस्टेरॉल आणि रेड ब्लड सेल्सची निर्मितीही केली जाते.
तशी तर लिव्हरमध्ये स्वत:ला हेल्दी ठेवण्याची क्षमता असते. पण जर तुमची लाइफस्टाईल चुकीची असेल तर तुमचं लिव्हर जास्त दिवस स्वत:ला वाचवू शकत नाही. जर लिव्हर खराब होत असेल तर याचे काही संकेत तुम्हाला तुमच्या नखांवर बघायला मिळतात.
रंगात बदल
लिव्हरमध्ये काही गडबड झाली तर नखांचा रंग बदलू लागतो. नखांचा रंग हलका पिवळा होऊ लागतो. सोबतच नखांचा पांढरा भाग पूर्णपणे नाहीसा होतो.
डार्क लाइन दिसते
हेल्दी नखांवर कोणताही डार्क लाइन नसते. पण जेव्हा लिव्हर खराब होऊ लागतं तेव्हा नखांवर काही लाल-भुरक्या किंवा पिवळ्या रंगाच्या जाडसर लाइन दिसू लागतात.
शेप बिघडतो
या अजिबात दुमत नाही सगळ्यांच्या नखांचा शेप वेगवेगळा असतो. पण ते जेव्हा अजब पद्धतीनं चपटे आणि त्वचेत घुसलेले दिसू लागतात तेव्हा हा लिव्हर खराब होत असल्याचं संकेत असू शकतो.
लवकर तुटणे
लिव्हर खराब होण्याच्या संकेतामध्ये नखं कमजोर होणं याचाही समावेश आहे. या स्थितीत नखांचे टोक तुटू लागतात किंवा क्रॅक येतात.
डॅमेज लिव्हरची इतर काही लक्षणं
मायो क्लीनिकनुसार, डॅमेज लिव्हरच्या लक्षणांमध्ये त्वचा पिवळी पडणं आणि डोळे पिवळे होणं हेही आहेत. याला काविळ म्हणतात. काळी किंवा भुरक्या रंगाची त्वचा, पोटदुखी, पोटात सूज, पायांवर सूज, त्वचेवर खाज, घट्ट लघवी, सतत थकवा, मळमळ-उलटी, भूक न लागणं यांचाही समावेश आहे.