असे पदार्थ जे कधीही खराब होत नाहीत, पदार्थ खराब होण्याची भीती वाटत असेल तर ही यादी पाहा!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 05:32 PM2021-06-11T17:32:09+5:302021-06-11T17:32:38+5:30

फ्रिजमध्ये अन्न ठेवल्यामुळे त्यातील अनेक पौष्टीक घटक कमी होतात. असे असले तरीही काही असे पदार्थ आहेत जे खराबच होत नाहीत. कोणते? पाहु...

Check out this list of foods that never go bad, if you're afraid of going bad! | असे पदार्थ जे कधीही खराब होत नाहीत, पदार्थ खराब होण्याची भीती वाटत असेल तर ही यादी पाहा!

असे पदार्थ जे कधीही खराब होत नाहीत, पदार्थ खराब होण्याची भीती वाटत असेल तर ही यादी पाहा!

googlenewsNext

आपल्या रोजच्या जेवणात पदार्थ खराब होऊ नयेत म्हणून आपण फार काळजी घेतो. सध्याच्या वातावरणात पदार्थ लवकर खराब होण्याची शक्यता जरा जास्त आहे. त्यामुळे त्याची अधिक काळजी घेतली गेली पाहिजे. साधारणत: प्रत्येक घरात पदार्थ ताजेतवाने ठेवण्यासाठी फ्रीजचा वापर केला जातो. सकाळचे अन्न फ्रिजमध्ये ठेऊन संध्याकाळी गरम करून खाल्ले जाते. मात्र हे घातक आहे. फ्रिजमध्ये अन्न ठेवल्यामुळे त्यातील अनेक पौष्टीक घटक कमी होतात. असे असले तरीही काही असे पदार्थ आहेत जे खराबच होत नाहीत. कोणते? पाहु...


तांदुळ
तांदुळ हा असा पदार्थ आहे जो कित्येक काळ ठेवला तरीही खराब होत नाही. तांदुळ जर ऑक्सिजनमुक्त बंद डब्यामध्ये ठेवला तर तब्बल ३० वर्षे राहु शकतो. त्याला ४० डिग्री तापमानातच ठेवावे.


मिल्क पावडर
दुध नाशवंत आहे पण दुधापासून तयार केलेली मिल्क पावडर ही बराच काळ ठेवली तरी राहते. ती फ्रीजमध्ये नाही ठेवली तरी चालते.

सुके बीन्स
राजमा, सोयाबीन, सुके मटार हे शिजवल्यानंतर अत्यंत स्वादिष्ट लागतात. हे बराच काळासाठी टिकतात आणि लवकर खराब होत नाहीत.


मध
मध हे एक नैसर्गिक उत्पादन आहे. मध मध्यमाश्यांनी साठवलेले असते. त्यामुळे ते मुळातच टिकाऊ असते. त्यामुळे घरातील मधाचे सेवन तुम्ही कधीही करू शकता.


साखर
साखरेला हवाबंद डब्यात ठेवल्यास साखर खराब होत नाही. साखर हे तयार उत्पादन आहे ज्याला किडे लागण्याचा धोका कमी असतो.


विनेगर
लोणची, डबाबंद पदार्थ टिकवण्यासाठी विनेगर वापरले जाते. पण विनेगर खरंच टिकाऊ आहे का? अर्थात जे सर्व पदार्थांना टिकवते ते विनेगर टिकाऊ असतेच. कितीही काळ ते जसेच्या तसे राहु शकते.

Web Title: Check out this list of foods that never go bad, if you're afraid of going bad!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.