महिनाभरात कमी होईल पोटाखाली जमा झालेली चरबी, ट्राय करा 'ही" सोपी एक्सरसाईज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 16:03 IST2025-01-01T15:59:44+5:302025-01-01T16:03:42+5:30

Chair Pose Yoga : बेली फॅट कमी करण्यासाठी चेअर पोज मदत करते. पण त्याआधी हे जाणून घ्या की, चेअर पोज कशी करावी.

Chair pose will help to loose belly fat in 30 days, know how to do it | महिनाभरात कमी होईल पोटाखाली जमा झालेली चरबी, ट्राय करा 'ही" सोपी एक्सरसाईज!

महिनाभरात कमी होईल पोटाखाली जमा झालेली चरबी, ट्राय करा 'ही" सोपी एक्सरसाईज!

Chair Pose Yoga : बेली फॅट म्हणजे पोटावरील चरबी कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय, एक्सरसाईज करत असतात. काहींना फायदा मिळतो तर काहींना नाही. अशात बेली फॅट कमी करण्यासाठी एक योगासन खूप फायदेशीर ठरू शकतं. बेली फॅट कमी करण्यासाठी चेअर पोज मदत करते. पण त्याआधी हे जाणून घ्या की, चेअर पोज कशी करावी.

चेअर पोजनं बेली फॅट कमी करण्यास खूप मदत मिळते. ही एक्सरसाईज थेट कोरला अॅक्टिव करते, ज्यामुळे मांसपेशींमध्ये सुधारणा होऊन मांसपेशी अॅक्टिव होतात. अशाप्रकारे चेअर पोजमध्ये बसल्यानं पोटावरील चरबी कमी होते. पोटाच्या आजूबाजूच्या मांसपेशींवर प्रेशर तयार होतं, ज्यामुळे फॅट पचण्यास मदत मिळते. अशात बेली फॅट कमी होते.

किती वेळ बसावं?

चेअर पोजमध्ये तुम्ही ३० सेकंद ते १ मिनिटांपर्यंत बसू शकता. यावेळी पाठ सरळ असावी, पाय सरळ आणि पोटावर सतत प्रेशर क्रिएट होत रहावा. काही दिवसांनी ही एक्सरसाईज ५ सेटमध्ये २० मिनिटं करा. रोज साधारण एक महिना ही एक्सरसाईज केली तर वजन लवकर कमी होईल.

पोश्चरही चांगलं होतं

बॉडी टोन्ड करण्यासाठीही चेअर पोजनं फायदा मिळतो. जेव्हा ही एक्सरसाईज करता तेव्हा शरीराचा प्रत्येक भाग टोन्ड होतो, मग ते पोट असो वा मांड्या किंवा कंबर असो. याने बॉडी टोनिंगसाठी फायदा मिळतो. तसेच हात आणि पायांवर जमा झालेली चरबी सुद्धा कमी करण्यास मदत मिळते.

चेअर पोजचे इतर फायदे

चेअर पोज एक्सरसाईज केल्यानं शरीराला अनेक फायदे मिळतात. यानं तणाव कमी होतो. यादरम्यान श्वासावर लक्ष केंद्रीत केल्यास मानसिक तणाव कमी होतो. तसेच आत्मविश्वास वाढतो आणि चिंताही दूर होते. अशात ही एक्सरसाईज तुम्ही नियमितपणे केली पाहिजे.

कशी कराल एक्सरसाईज?

Web Title: Chair pose will help to loose belly fat in 30 days, know how to do it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.