गर्भाशय मुखाची कर्करोग प्रतिबंधक लस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 05:20 IST2026-03-01T05:20:37+5:302026-03-01T05:20:48+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क  मुंबई : गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होऊ नये, यासाठी  १४ वर्षे पूर्ण झालेल्या; परंतु १५ वर्षे पूर्ण ...

Cervical cancer vaccine | गर्भाशय मुखाची कर्करोग प्रतिबंधक लस

गर्भाशय मुखाची कर्करोग प्रतिबंधक लस

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होऊ नये, यासाठी  १४ वर्षे पूर्ण झालेल्या; परंतु १५ वर्षे पूर्ण न झालेल्या मुलींना एचपीव्ही लस देण्यासाठीच्या देशव्यापी एचपीव्ही लसीकरण मोहिमेला सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली.

मुंबई सेंट्रल येथील टोपीवाला वैद्यकीय महाविद्यालय व नायर रुग्णालय येथे ५ लाभार्थ्यांना एचपीव्ही लस देऊन मुंबईसह महाराष्ट्रस्तरीय मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. पहिल्या टप्प्यात पालिका शाळांमधील लाभार्थी मुलींचे तर पुढील टप्प्यात इतर खासगी व अनुदानित शाळा येथील लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येईल. मुंबईत १ लाख ३० हजार लाभार्थी आहेत.

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग चिंतेची बाब आहे; परंतु लसीकरण करून हे टाळणे शक्य आहे.  नागरिकांनी मुंबईत  १ लाख ३० हजार लाभार्थी आहेत. मुलींना या मोहिमेदरम्यान एचपीव्ही लस देऊन मुलींचे भविष्य हे गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून सुरक्षित करावे. ही लस संपूर्णपणे सुरक्षित आहे. त्यामुळे पालकांनी चिंता करू नये, असे आवाहन त्यांनी केले. 
याप्रसंगी नगरसेवक रोहिदास लोखंडे, नगरसेविका अमरीन अब्राहनी, राज्य आरोग्य विभागाचे सचिव  ई. रविंद्रन, राज्य आरोग्य संचालनालयाच्या आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, महानगरपालिकेचे वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये संचालक डॉ. शैलेश मोहिते, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा, केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत, नायर दंत रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. माला दीक्षित उपस्थित होते. 

तीन महिने २८४ आरोग्य संस्थांमध्ये मोहीम 
लसीकरण मोहीम ३ महिने सुरू राहील आणि त्यानंतर नियमित लसीकरण कार्यक्रमाचा भाग होईल. महापालिकेतील २३६ आरोग्य केंद्र, २७ प्रसूतिगृहे, १६ सर्वसाधारण रुग्णालय व ५ वैद्यकीय महाविद्यालय अशा एकूण २८४ आरोग्य संस्था येथे लस देण्यात येईल. लसीकरणासाठीची नोंदणी आणि प्रमाणपत्र वाटप हे ‘यू-विन’  पोर्टलद्वारे डिजिटल पद्धतीने केले जाईल.

Web Title : गर्भाशय ग्रीवा कैंसर की रोकथाम के लिए महाराष्ट्र में एचपीवी टीकाकरण अभियान शुरू

Web Summary : महाराष्ट्र ने 14-15 वर्ष की लड़कियों के लिए गर्भाशय ग्रीवा कैंसर से बचाव हेतु राज्यव्यापी एचपीवी टीकाकरण अभियान शुरू किया। टीकाकरण 284 स्वास्थ्य संस्थानों में होगा। पंजीकरण और प्रमाणन यू-विन पोर्टल के माध्यम से डिजिटल रूप से प्रबंधित किया जाएगा।

Web Title : Maharashtra Launches HPV Vaccine Drive for Cervical Cancer Prevention

Web Summary : Maharashtra initiated a statewide HPV vaccination campaign targeting girls aged 14-15. The drive aims to protect against cervical cancer, with vaccinations occurring across 284 health institutions. Registration and certification will be managed digitally via the U-WIN portal.