महिलांच्या मृत्यूचं दुसरं सर्वात मोठं कारण ठरतो 'हा' आजार; लक्षणं वेळीच घ्या लक्षात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2019 12:01 PM2019-11-07T12:01:13+5:302019-11-07T12:04:26+5:30

काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या एका संशोधनामधून असा दावा करण्यात आला आहे की, दरवर्षी सर्वाइकल कॅन्सरने पीडित एक लाखांहून अधिक रूग्ण समोर येतात.

Cervical cancer reasons and symptoms | महिलांच्या मृत्यूचं दुसरं सर्वात मोठं कारण ठरतो 'हा' आजार; लक्षणं वेळीच घ्या लक्षात

महिलांच्या मृत्यूचं दुसरं सर्वात मोठं कारण ठरतो 'हा' आजार; लक्षणं वेळीच घ्या लक्षात

googlenewsNext

(Image Credit : Oslo Cancer Cluster)

काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या एका संशोधनामधून असा दावा करण्यात आला आहे की, दरवर्षी सर्वाइकल कॅन्सरने पीडित एक लाखांहून अधिक रूग्ण समोर येतात. खास गोष्ट म्हणजे, यांपैकी 70 टक्क्यांपेक्षा जास्त संख्या महिलांची असते. तसेच देशात कॅन्सरमुळे मृत्यू होणाऱ्यांपैकी जवळपास 11 टक्के मृत्यू हे सर्वाइकल कॅन्सरमुळे होतात. 

संशोधनातून समोर आलेला हा आकडा थक्क करणारा असून आजारांमुळे मृत्यू होणाऱ्या महिलांमधील सर्वाइकल कॅन्सर हे दुसरं सर्वात मोठ कारण आहे. सर्वाइकल कॅन्सरबाबत तज्ज्ञाचं म्हणणं आहे की, हे साधारणतः ह्युमन पपिल्लोमा व्हायरस किंवा एचपीवीमुळे होतो. 

सर्वाइकल कॅन्सर म्हणजेच गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा महिलांच्या योनीमार्गात अस्वच्छतेमुळे गर्भाशयाच्या तोंडावर "ह्युमन पपिल्लोमा व्हायरस'(एचपीव्ही) या विषाणू द्वारे होणारा कर्करोग आहे. हा विषाणू हळुवार कार्यरत होत असल्याने रोगाच्या सुरवातीला निदान होणे कठिण असते व आजार अगदी वरच्या स्तरात पोचल्यावर त्याचे निदान होते. अशा परिस्थितीत उपचारपद्धती अयशस्वी होऊन काही काळातच रुग्ण दगावतो. एका रिसर्चनुसार, जगभरात दरवर्षी 5 लाख या कॅन्सरची प्रकरणे समोर येतात. यात 27 टक्के केवळ भारतातील महिलांचा समावेश आहे. 

सर्वायकल कॅन्सरची लक्षणं

यात योनीतून असामान्य रक्तस्त्राव, शारीरिक संबंध ठेवताना रक्तस्त्राव होतो. त्यासोबतच शारीरिक संबंध ठेवताना वेदना होणे, कंबरदुखी, पाय दुखणे, थकवा, वजन कमी होणे, भूक न लागणे हे लक्षणे आढळतात. 

सर्वायकल कॅन्सरवर उपचार

  • इतर कॅन्सरप्रमाणे हा कॅन्सर सुद्धा वेळीच माहीत झाला. आणि योग्य वेळेवर उपचार केले गेले तर तुमचा फायदा होऊ शकतो.
  • महिलांना नियमितपणे आपली टेस्ट करावी. 
  • दर तीन वर्षांनी पॅप स्मीअर टेस्ट करावी.
  • त्यासोबतच एचपीवी व्हायरसपासून बचावासाठी योग्य लसी घेणे.
  • धुम्रपान न करणे, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे, हेल्दी आहार घेणे आणि एक्सरसाइज करणे.

 

(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)

Web Title: Cervical cancer reasons and symptoms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.