तीळाचा बदलता आकार अन् रंग असु शकतं कॅन्सरचं लक्षण, वेळीच सावध व्हा! तज्ज्ञांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2021 04:47 PM2021-11-28T16:47:12+5:302021-11-28T16:50:09+5:30

तीळ आणि मेलेनोमा (Melanoma) एकाच प्रकारच्या पेशी मेलेनोसाइट्सपासून (Melanocytes) तयार होतात आणि ते निसर्गत: (Nature) सारखेच असतात. हे दोन्ही प्रकार म्हणजे त्वचेच्या गाठी (Skin tumor) आहेत. परंतु तीळ हानीकारक नाही. तर, मेलेनोमा कर्करोगजन्य (Cancer) आहे आणि त्यावर उपचार करणं आवश्यक आहे, अन्यथा ते प्राणघातक ठरू शकतं.

causes, symptoms remedies of melanoma cancer | तीळाचा बदलता आकार अन् रंग असु शकतं कॅन्सरचं लक्षण, वेळीच सावध व्हा! तज्ज्ञांचा सल्ला

तीळाचा बदलता आकार अन् रंग असु शकतं कॅन्सरचं लक्षण, वेळीच सावध व्हा! तज्ज्ञांचा सल्ला

Next

 तीळाबाबत आपल्या मनात अनेक समज-गैरसमज असतात. मात्र, यापैकी काही तीळांबाबत सावध राहण्याची गरज आहे. कारण तीळ आणि मेलेनोमा (Melanoma) एकाच प्रकारच्या पेशी मेलेनोसाइट्सपासून (Melanocytes) तयार होतात आणि ते निसर्गत: (Nature) सारखेच असतात. हे दोन्ही प्रकार म्हणजे त्वचेच्या गाठी (Skin tumor) आहेत. परंतु तीळ हानीकारक नाही. तर, मेलेनोमा कर्करोगजन्य (Cancer) आहे आणि त्यावर उपचार करणं आवश्यक आहे, अन्यथा ते प्राणघातक ठरू शकतं.

नेचर सेल बायोलॉजीमध्ये (Nature Cell Biology) प्रकाशित केलेल्या अभ्यासात, अमेरिकेतील दि युनिव्हर्सिटी ऑफ उटाह (The University of Utah) विद्यापीठातील संशोधक रॉबर्ट जुडसन टोरेस यांनी सामान्य तीळ मेलेनोमामध्ये कसा बदलू शकतो, याची माहिती दिली आहे. सूर्यकिरणांच्या दुष्परिणामांपासून बचाव करण्यासाठी मेलानोसाइट्स पेशी त्वचेला रंग देतात. मेलानोसाइट्सच्या डीएनए क्रमातील विशिष्ट बदलाला BRAF जनुक उत्परिवर्तन (BRAF gene mutation) म्हणतात. ते ७५ टक्के तीळांमध्ये (Do not take lightly the mole of the Skin) आढळते.

रॉबर्ट जडसन टोरेस (Robert Judson Torres) यांच्या मते, हे बदल सुमारे ५० टक्के मेलेनोमा आणि आतडी आणि फुफ्फुसाच्या सामान्य कर्करोगांमध्ये देखील आढळतात. आतापर्यंत असं मानलं जात आहे की, मेलेनोसाइट्समध्ये दोन प्रकारचं उत्परिवर्तन होतं. ज्यामुळं पेशींचं विभाजन नियंत्रित आणि अनियंत्रित होते. हाच तीळ आणि मेलेनोमा (कर्करोगाचा एक प्रकार) यांच्यातील फरक आहे.

कशी होते याची सुरुवात
असं आढळून आलंय की, मेलेनोसाइट्सचं मेलेनोमामध्ये रूपांतर होण्यासाठी कोणत्याही अतिरिक्त उत्परिवर्तनाची आवश्यकता नसते. त्वचेत असलेल्या मेलॅनिन नावाच्या त्वचेला रंग देणाऱ्या रंगद्रव्याशी प्रखर सूर्यकिरणांचा अचानक संबंध आल्यास किंवा सूर्यप्रकाशातील अतिनील किरणांशी (ultraviolet Rays) संपर्क आल्यास किंवा अचानक तीव्र स्वरूपाच्या वातावरणीय बदलांचा सामना करावा लागत असल्यास त्वचेवर परिणाम होतो. यातून मिळणाऱ्या वेगळ्या सिग्नल्समुळं मेलेनोसाइट्सचे जीन्स वेगवेगळ्या वातावरणात वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होतात. त्यांचा वातावरणातील बदलांना मिळणारा प्रतिसाद बदलतो. याचा अर्थ, मेलेनोमा पर्यावरणीय संकेतांमुळं (environmental signals) सुरू होतो.

तीळ किंवा चामखीळ हे चिंतेचे कारण आहे का?
कर्करोग नसलेले तीळ सामान्यतः एकसमान आणि आकारात सममितीय असतात. तर, मेलेनोमा बहुतेक वेळा आकारात असममित असतात. मेलेनोमामध्ये, तीळ किंवा चामखीळ यांच्या सीमा अनेकदा वेड्यावाकड्या असतात किंवा आकारात अनियमित असतात. तर कर्करोग नसलेल्या तीळांना सहसा गुळगुळीत, चांगल्या प्रकारे कडा असतात.

जेव्हा शरीरावर जखम किंवा जखमा असतात तेव्हा त्वचेवर अनेकदा एकापेक्षा जास्त रंग दिसतात. ते असमान असू शकतात. काळ्या, तपकिरी, लाल आणि गुलाबी रंगाच्या वेगवेगळ्या छटांमध्ये त्वचेचा कर्करोग किंवा तीळ दिसू शकतात. तसंच, तुमच्या शरीरावरील इतर तीळांपेक्षा गडद रंगाचे तीळ शोधा. जे तीळ सौम्य असतात, ते सहसा एकाच रंगाचे असतात.

Web Title: causes, symptoms remedies of melanoma cancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app