शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ३० मे पासून ५ टक्के, तर ५ जून पासून १० टक्के पाणी कपात
2
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
3
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
4
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
5
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
6
हाताला सलाईन, रुग्णालयाच्या बेडवर झोपलेला दिसला मुनव्वर फारूकी, चाहते चिंतेत
7
Hyundai IPO: दिग्गज कार कंपनी आणणार देशातील सर्वात मोठा IPO, लिस्टिंगचा आहे प्लान
8
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
9
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
10
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
11
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
12
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
13
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
14
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
15
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
16
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
18
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
19
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
20
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या

ब्रेन स्ट्रोकची 'ही' लक्षणे आत्ताच जाणून घ्या, दुर्लक्ष केल्यास येईल आयुष्यभरासाठीचं अपंगत्व

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 12:35 PM

स्ट्रोक हा सर्वसाधारणपणे उतारवयात होण्याचा आजार असला, तरी अलीकडे तरुण वयातही स्ट्रोक येण्याचं प्रमाण वाढलं आहे. जर त्रास होत असेल तर लक्षणे सुरू होण्याच्या वेळेवर विशेष लक्ष द्या.

स्ट्रोक म्हणजे पॅरालिसीसचा अटॅक अथवा लकवा. याला ब्रेन अटॅक असंही म्हटलं जातं. उच्च रक्तदाब, डायबिटीस, हृदयविकार, जास्त कोलेस्ट्रॉल, धुम्रपान, मद्यसेवन या कारणांमुळे स्ट्रोक येण्याची शक्यता वाढते. भारतात दरवर्षी जवळपास १५ लाख लोकांना स्ट्रोक हा आजार सतावतो. स्ट्रोक हा सर्वसाधारणपणे उतारवयात होण्याचा आजार असला, तरी अलीकडे तरुण वयातही स्ट्रोक येण्याचं प्रमाण वाढलं आहे. जर त्रास होत असेल तर लक्षणे सुरू होण्याच्या वेळेवर विशेष लक्ष द्या. स्ट्रोक सुरू झाल्यानंतर काही उपचारांचे पर्याय सर्वात प्रभावी असतात. लक्षणे थांबतात का हे पाहण्याची प्रतीक्षा करू नका. जितका उशीर उपचारासाठी होईल तितका मेंदूचे नुकसान आणि अपंगत्व येण्याची शक्यता जास्त असते. डॉ. शैलेश जैन यांनी द हेल्थ साईट या  वेबसाईटला याची लक्षणे सांगितली आहेत.

कशा मुळे होतो ब्रेन स्ट्रोक ?जेव्हा आपल्या मेंदूत एखाद्या भागाचा रक्तपुरवठा खंडित होतो किंवा कमी होतो तेव्हा मेंदूच्या पेशींना ऑक्सिजन आणि पोषक द्रव्ये मिळण्यापासून रोखले जाते तेव्हा स्ट्रोक होतो. मेंदूच्या पेशी काही मिनिटांतच मरतात. स्ट्रोक ही वैद्यकीय एमार्जन्सी आहे आणि त्यावर त्वरित उपचार करणे अत्यंत आवश्यक आहे. लवकर उपचार केल्यास नुकसान कमी होते. प्रभावी उपचार स्ट्रोकपासून अपंगत्व रोखण्यास देखील मदत करू शकतात.

ब्रेन स्ट्रोकची कारणे?

  • उच्च रक्‍तदाब
  • मधुमेह
  • धूम्रपान
  • हृदयविकार
  • लठ्ठपणा
  • वार्धक्ययामुळे अर्धांगवायू होऊ शकतो.

ही आहेत लक्षणं!

  • डोळ्यांपुढे अंधारी येणे
  • चालताना अडखळणे अथवा शरीराचे संतुलन बिघडणे
  • बोलताना अडखळणे
  • समरणशक्तीवर परिणाम होणेऑ
  • बधिरता येणे
  • अशक्तपणा येणे
  • धुरकट किंवा दुहेरी प्रतिमा दिसणे
  • अचानक ओकारीसह डोकेदुखी

असे करता येते निदानप्रत्येक स्ट्रोकच्या निदानासाठी एमआरआय, ब्रेन अँजिओग्राम या चाचण्या केल्या जातात. रिस्क फॅक्टर शोधण्यासाठी हिमोग्लोबीन, रक्तातील साखर, लिपीड प्रोफाईड, होमोसिस्टिन २ डी इको या चाचण्या केल्या जातात.

ब्रेन स्ट्रोकवरील उपचारअलीकडे ब्रेन स्ट्रोकच्या उपचारात बरीच क्रांती झाली आहे. जर स्ट्रोक झाल्याच्या साडे चार तासाच्या आत आपण रुग्णालयात पोहोचला आणि सीटी स्कॅनमध्ये रक्तस्त्राव नसेल, तर रक्तातील गाठ वितळवणारं औषध दिल्यास बराच फायदा होऊ शकतो. अर्थात हे औषध देण्यापूर्वी डॉक्टर काही गोष्टींची खात्री करुन घेतात. कधी-कधी या औषधाने मेंदूत रक्तस्त्राव होणं यासारखी गंभीर गुंतागुंत देखील होऊ शकते.  उच्च, रक्तदाब, मधुमेह, धुम्रपान यांचे नियंत्रण करणं हे देखील खूप महत्त्वाचं असतं. हातापायाची ताकद हळूहळू सहा महिन्यांपर्यंत सुधारते. पण त्यासाठी फिज‌िओथेरपी खूप महत्त्वाची असते. उपचारासाठी कधीकधी न्युरोसर्जरीची वेळ येऊ शकते.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स