शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अशा 'लाडक्या बहि‍णींना' १५०० रुपयांऐवजी केवळ ५०० रुपयेच मिणार? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं!
2
तुमचे १०० बाप खाली आले तरी शिवसेनेचे अस्तित्व संपवता येणार नाही; ठाकरेंचा नाशिक दौरा, टिझर आला
3
PM मोदींच्या गुजरातमधून सुरुवात, काँग्रेसमध्ये नवचैतन्य येणार; राहुल गांधींचा प्लान काय?
4
ईडीची सहारा समूहावर मोठी कारवाई! लोणावळ्यातील अ‍ॅम्बी व्हॅलीची ७०७ एकर जागा जप्त
5
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का; MUDA प्रकरणात लोकायुक्त पोलिसांच्या क्लीन चिटवर न्यायालय समाधानी नाही
6
१०० कोटींच्या ऑर्डरची बतावणी करत बिहारमध्ये बोलावून खून..! पुण्यातील उद्योजकाच्या हत्येने खळबळ
7
"लाडक्या बहिणींच्या मतांची किंमत आता ५०० रुपयांवर आली, उद्या...!"; राऊतांचा हल्लाबोल
8
PBKS vs KKR : जुन्या संघावर राग काढायचं सोडा एक धाव नाही काढली; श्रेयसच्या पदरी पडला सातवा भोपळा!
9
Russia Ukraine War : युक्रेनमध्ये अमेरिकेच्या सर्वात शक्तिशाली फायटर जेटच्या चिंधड्या! रशियाच्या 'या' मिसाइलनं केली कमाल; टेंशनमध्ये आला पाकिस्तान
10
दानवेंसोबतचा वाद मातोश्रीवर मिटला! ठाकरेंची भेट घेतल्यावर खैरे म्हणाले, “आम्ही दोघे आता...”
11
अयोध्येतील राम मंदिर बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, तामिळनाडूतून ईमेल, सुरक्षा यंत्रणा अलर्ट!
12
मंत्रालयातल्या निवृत्त कर्मचाऱ्याने सायबर फसवणुकीमुळे संपवले जीवन; आरोपीला गुजरातमधून अटक
13
“मंत्र्यांचे पगार, बंगले नुतनीकरणास निधी, पण शेतकऱ्यांसाठी सरकारकडे पैसा नाही”: आदित्य ठाकरे
14
ज्या बंदुकीच्या टोकावर दरोडेखोरांनी ३० तोळे सोनं लुटलं तीच निघाली प्लॅस्टिकची..! पुण्यातील प्रकार
15
आणखी थोडी किंमत वाढविली असती तर ५० लाखच टच...! फोक्सवॅगनची नवीन एसयुव्ही भारतात लाँच झाली...
16
रस्ता ओलांडताना भरधाव ट्रेलरची धडक, आठ वर्षाची चिमुकली जागीच ठार, नवी मुंबईतील घटना
17
चैत्र संकष्ट चतुर्थी: राशीनुसार ‘या’ मंत्रांचे जप करा, भरघोस लाभ मिळवा; कोणते उपाय करावेत?
18
आधी २४ यार्ड्समधील 'दुश्मनी'चं प्रकरण गाजलं; आता रिलीज झालं बुमराह-नायर यांच्यातील 'दोस्ती'चं गाणं
19
शिंदे यांची दादांविरूद्ध तक्रार, अमित शाह यांच्या उत्तराचा राऊतांकडून सस्पेन्स
20
लॉकी फर्ग्युसनच्या जागी कोण खेळणार? पंजाबकडे आहेत 'हे' ३ घातक गोलंदाज!

वायरल ताप लगेच दूर करण्यासाठी करा हे घरगुती उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2018 09:57 IST

वातावरण बदलामुळे सध्या वायरल तापाने सगळेजण हैराण आहेत. पण हा वायरल ताप दूर करण्यासाठी सतत अॅंटीबायोटीक खाल्यानेही साइड इफेक्ट होण्याचा धोका असतो.

वातावरण बदलामुळे सध्या वायरल तापाने सगळेजण हैराण आहेत. पण हा वायरल ताप दूर करण्यासाठी सतत अॅंटीबायोटीक खाल्यानेही साइड इफेक्ट होण्याचा धोका असतो. त्यामुळे तुम्हाला वायरल इन्फेक्शनची लक्षणे दिसताच काही घरगुती उपायांनीही हा त्रास दूर करु शकता. वायरल ताप जास्तच असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. 

वातावरण बदलामुळे, खाण्या-पिण्यात बदल झाल्याने किंवा शारीरिक कमजोरीमुळे वायरल ताप येतो. वायरल ताप आपल्या शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीला कमजोर करतो. त्यामुळे शरीरात इन्फेक्शन वेगाने पसरतं. वायरलचं इन्फेक्शन वेगाने एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचतं. 

वायरल तापाची लक्षणे

वायरल ताप आला की, घशात दुखणे, खोकला, कोरडा खोकला, डोकेदुखी, थकवा, सांधेदुखी, उलटी, पोट बिघडणे, डोळे लाल होणे आणि कपाळ अधिक गरम होणे ही आहेत. मोठ्यांसोबतच वायरल ताप हा लहान मुलांमध्ये लगेच पसरतो.  चला जाणून घेऊ यावर काही घरगुती उपाय...

१) हळद आणि आलं पावडर

आल्यामध्ये अॅंटीऑक्सिडेंट्सचे गुण असतात जे ताप कमी करण्यासाठी मदत करतात. एक चमचा काळ्या मिऱ्याचा चूर्ण, एक चमचा हळदीचं चूर्ण आणि एक चमचा सुंठ किंवाआल्याचं पावडर एक कप पाण्यात मिश्रित करा. हवी असल्यास त्यात थोडी साखर घाला. हे पाणी चांगलं उकळू द्या आणि थंड झाल्यावर त्याचं सेवन करा. याने वायरल ताप दूर होण्यास मदत होऊ शकते 

२) तुळशीची पाने

तुळशीममध्ये अॅंटीबायोटिक गुण असतात. जे शरीरातील व्हायरस नष्ट करतात. एक चमचा लवंगेचं चूर्ण आणि दहा ते पंधरा तुळशीची पाने एक लिटर पाण्यामध्ये टाकून उकळून घ्या. नंतर पाणी गाळून थंड झाल्यावर एका तासात प्यावे. याने वायरल ताप लगेच दूर होईल. 

३) मेथीचं पाणी

 मेथीचे दाणे एका कपामध्ये रात्रभर भिजवून ठेवा आणि सकाळी हे पाणी गाळून प्यावे. याने लगेच आराम मिळेल.

४) लिंबू आणि मध

लिंबाचा रस आणि मध वायरल तापाचा प्रभाव कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो. वायरल तापात मध आणि लिंबाचा रस एकत्र करुन प्या. याने आराम मिळेल.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य