लहान मुलांनाही मोतीबिंदू का होतो? आणि याची लक्षणे कोणती? वेळीच व्हा सावध...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2024 10:38 AM2024-01-13T10:38:19+5:302024-01-13T10:41:19+5:30

लक्षणीय अशा मोतीबिंदूचे लवकर निदान आणि त्यावर त्वरित उपचार होणे योग्य उपचार पद्धतीमध्ये आवश्यक आहे.

causes cataract and common sympotoms  of cortracts in children in early age | लहान मुलांनाही मोतीबिंदू का होतो? आणि याची लक्षणे कोणती? वेळीच व्हा सावध...

लहान मुलांनाही मोतीबिंदू का होतो? आणि याची लक्षणे कोणती? वेळीच व्हा सावध...

What causes cataracts in children : मोतीबिंदूसारखा दृष्टिदोष साधारणपणे उतारवयात होतो. मात्र, अनेकदा तो  लहान मुलांमध्येही हा दृष्टिदोष झालेला दिसून येतो. मोतीबिंदू मुलांमध्ये होण्याची प्रमुख तीन ते चार घटक कारणीभूत ठरतात. 

डॉक्टर काय सांगतात?

पालकांनी जागरूक राहावे. शंका वाटल्यास बाळांचेही दरवर्षी डोळे चेक करावेत. यामध्ये फक्त मोतीबिंदूच नव्हे चष्मा लवकर लागतो का हेदेखील कळते. लवकर निदान झाले तर तितकाच चांगला उपचार होतो. 

 लहान मुलांमध्ये मुले आपल्या डोळ्यांच्या आजरांविषयी अनभिज्ञ असू शकतात. मात्र, आई, वडील त्याकडे लक्ष देऊ शकतात, मोतीबिंदू ओळखू शकतात.

 विशेषत: रात्रीच्या वेळी हेडलाइट्स पाहताना दिव्यांभोवती प्रभामंडल (चकाकी) दिसणे.

  प्रभावित डोळ्यांतील काही प्रकरणांमध्ये दुहेरी दृष्टी

 काहींना जन्मजात, तर काहींना जन्मल्यानंतर मोतीबिंदू विकसित होत जातो. यावर तातडीने उपचार केल्यास त्यांची नजर पूर्ववत होण्यास मदत होते. 

 आपले डोळे हे बुबुळ, कॉर्निया, लेन्स, व्हिट्स आणि मागचा पडदा म्हणजे रेटिना यापासून बनलेला असतो. 

  रंगात उधळलेले पाहणे

 उजळ वाचन प्रकाश आवश्यक आहे

 सूर्यप्रकाश आणि तेजस्वी दिवे वाढणारी संवेदनशीलता

 चष्म्यासाठी वारंवार प्रिस्क्रिप्शन बदल

आनुवंशिकता काही प्रमाणात ठरतोय कारणीभूत :

बाळाच्या डोळ्यांमध्ये दोन प्रकारे मोतीबिंदू होतात. आई कुपोषित असेल तर आहारांमधून आवश्यक पोषक घटक बाळाला मिळत नाहीत. त्यामुळे डोळ्यांमध्ये हा दोष निर्माण होतो तर दुसऱ्या प्रकारामध्ये बाळाला जन्मजात ‘रुबेला सिन्ड्रोम’सारखे आजार असतात. आनुवंशिकता हा घटकही काही प्रमाणात यास कारणीभूत ठरतो.

मोतीबिंदू म्हणजे यातील लेन्सला पांढरटपणा येणे. तो डोळ्यानेही दिसतो. हे हळूहळू विकसित होते. आपल्या दृष्टीमध्ये हस्तक्षेप करण्यास सुरवात करते. उपचार न केल्यास संपूर्ण अंधत्व येऊ शकते.

Web Title: causes cataract and common sympotoms  of cortracts in children in early age

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.