प्रमाणापेक्षा जास्त फुलकोबी खाल्ल्याने होऊ शकतात या गंभीर समस्या, वेळीच व्हा सावध!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 14:21 IST2022-08-29T14:20:55+5:302022-08-29T14:21:25+5:30
Cauliflower Side Effects: फुलकोबी दिवसायला जेवढी चांगली दिसते तेवढेच या भाजीचे शरीराला फायदेही होतात. यात अनेक प्रकारचे पोषक तत्व असतात जे आपल्या आरोग्यासाठी फार फायदेशीर असतात.

प्रमाणापेक्षा जास्त फुलकोबी खाल्ल्याने होऊ शकतात या गंभीर समस्या, वेळीच व्हा सावध!
Side Effects Of Cauliflower: फ्लॉवर म्हणजेच फुलकोबी लोकांची एक आवडती भाजी आहे. या भाजीपासून वेगवेगळे पदार्थही तयार केले जातात. वेगवेगळ्या पदार्थांमध्ये याचा समावेशही केला जातो. ही भाजी करणं तसं सोपं आहे आणि ती शिजवण्यासाठी जास्त वेळही लागत नाही. पण तज्ज्ञांनुसार फुलकोबीचं जास्त प्रमाणात सेवन करणं नुकसानकारकही ठरू शकतं. ग्रेटर नोएडातील GIMS हॉस्पिटलमध्ये कार्यरत डायटिशिअन डॉ. आयुषी यादव यांनी फुलकोबी प्रमाणातपेक्षा जास्त का खाऊ नये याची कारणे सांगितली आहेत.
फुलकोबीचं जास्त सेवन का आहे नुकसानकारक!
फुलकोबी दिवसायला जेवढी चांगली दिसते तेवढेच या भाजीचे शरीराला फायदेही होतात. यात अनेक प्रकारचे पोषक तत्व असतात जे आपल्या आरोग्यासाठी फार फायदेशीर असतात. मग असं काय कारण आहे की, याचं जास्त सेवन आपल्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं.
1) पोटात गॅस
फुलकोबीमध्ये रेफिनोज नावाचं तत्व असतं. जे एकप्रकारचं कार्बोहायड्रेट आहे. ज्याला आपलं शरीर नैसर्गिक पद्धतीने ब्रेक करू शकत नाही आणि हे छोट्या आतडीतून मोठ्या आतडीमध्ये पोहोचतं. ज्यामुळे पोटात जास्त प्रमाणात गॅस तयार होऊ लागतो.
2) थायरॉइड
ज्या लोकांना थायरॉइडच्या समस्येचा सामना करावा लागतो, त्यांच्यासाठी फुलकोबीचं सेवन करणं नुकसानकारक ठरू शकतं. कारण यामुळे टी-3 आणि टी-4 हार्मोनचं सिक्रिशन वाढू लागतं. जे या समस्येच्या रूग्णांसाठी अजिबात चांगलं नाही.
3) रक्त घट्ट होईल
फुलकोबीला पोटॅशिअमचा रिच सोर्स मानलं जातं. त्यामुळे जे लोक फुलकोबीचं जास्त सेवन करतात त्यांचं रक्त हळूहळू घट्ट होऊ लागतं. ज्या लोकांना हार्ट अटॅक येऊन गेला त्यातील अनेक लोक रक्त पातळ करण्यासाठी औषधांचं सेवन करतात. अशात त्यांनी फुलकोबीचं सेवन करणं धोकादायक ठरू शकतं.