आपल्या गर्लफ्रेंडसोबत किंवा जोडीदारसोबत कॅन्डल लाईट डिनरला जायला कोणाला नाही आवडणार. सध्याच्या बदलत्या काळात आपल्या प्रिय व्यक्तीसोबत कॅन्डल लाईट डिनरला जायला सगळेच उत्सूक असतात. कारणं तेवढाच चांगला वेळ घालवण्यासाठी एक ठिकाणं कपल्सना मिळत असतं. पण हेच कॅन्डल लाईट डिनर जीवघेणं ठरू शकतं. जाणून घ्या कॅन्डल लाईट डिनरमध्ये असं काय घडल्याने जीवाला धोका उद्भवू शकतो.

रिसर्चनुसार एक धक्कादायक बाब समोर आली आहे. ज्यात असे स्पष्ट झालं आहे की मेणबत्ती मधून निघणारा धूर हा  शरीरासाठी घातक असतो. तसंच सिगारेटच्या धूराप्रमाणेच मेणबत्ती मधून निघणारा धूर नुकसानकारक ठरतो. त्यातून बाहेर येणारे विषारी घटक शरीराला बाधा निर्माण करू शकतात. 

साऊथ कैरोलीना स्टेट ऑफ युनिव्हरसीटीच्या तज्ञांनी मेणबत्तीच्या सॅमपल्सची चाचणी केलेली. त्यानुसार पैराफीन असणाऱ्या मेणबत्ती मधून निघणारा धुर हा शरीरातील फुफ्फुसांसाठी धोकादायक ठरतो.  ज्यामुळे दमा आणि फुफ्फुसांचा कॅन्सर होण्याची शक्यता असते. 

मेणबत्तीचा धूर शरीरासाठी हानीकारक ठरतो. म्हणून मेणबत्तीच्या प्रकाशात जेवण करणाऱ्यासाठी आणि मेणबत्तीच्या प्रकाशात जेवण करणाऱ्यांसाठी धोकादायक ठरू शकतं. या धुरामुळे एग्जीमा, दमा, तसेच त्वचेशी संबंधीत आजार उद्भवु शकतात. 

Web Title: Candlelight dinner may cause harm to body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.