शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकट; KL राहुलनं एक कॅच सोडला
4
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
5
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
6
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
7
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
8
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
9
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
10
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
11
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
12
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
13
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
14
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
15
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
16
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
17
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
18
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
19
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल

संशोधकांचा नवा शोध! कॅन्सरला संपवणारा व्हायरस आला, लसीद्वारे शरीरात सोडण्यात यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2022 18:30 IST

प्राण्यांवरील यशस्वी चाचणीनंतर आता मानवावरही याची चाचणी सुरू करण्यात आली आहे. व्हॅक्सिनिया (Vaxinia) हा कॅन्सर किलिंग व्हायरस (Cancer Killing Virus) म्हणजे कर्करोगाचा खात्मा करणारा विषाणू पहिल्यांदाचा मानवी शरीरात सोडण्यात आला आहे.

व्हायरस म्हटलं तरी अनेकांच्या काळजात धस्सं होतं. कारण सध्या सर्वत्र कोरोनाव्हायरसची दहशत आहे. त्यात मंकीपॉक्स व्हायरसचंही संकट आहे. त्यामुळे व्हायरस म्हटलं की धडकीच भरते. पण असाच एक व्हायरस आता जीव वाचवण्यात मदत करणार आहे. हा व्हायरस कोणत्या जीवाचा नव्हे तर जीवघेण्या कॅन्सरचा खात्मा करणार आहे. प्राण्यांवरील यशस्वी चाचणीनंतर आता मानवावरही याची चाचणी सुरू करण्यात आली आहे. व्हॅक्सिनिया (Vaxinia) हा कॅन्सर किलिंग व्हायरस (Cancer Killing Virus) म्हणजे कर्करोगाचा खात्मा करणारा विषाणू पहिल्यांदाचा मानवी शरीरात सोडण्यात आला आहे.

कॅन्सरवर अनेक प्रकारचे उपचार करता येत असले, तरी सहसा तो असाध्य आजारच असतो. अगदीच पहिल्या टप्प्यात त्याचं निदान झालं, तरच कॅन्सरच्या रुग्णाला जीवदान मिळतं. अन्यथा उपचारांचा खूप प्रभावी उपयोग होत नाही. कॅन्सरवरचे नवनवे प्रभावी उपचार शोधून काढण्यासाठी वैद्यकीय शास्त्रज्ञ अहोरात्र संशोधन करत असतात. अशाच संशोधनातून कॅन्सर नष्ट करणारा व्हायरस व्हॅक्सिनिया सापडला.  हा कॅन्सर किलिंग व्हायरस  रुग्णाच्या शरीरातली आतडी, स्तन, गर्भाशय, स्वादुपिंड आदी अवयवांमध्ये तयार झालेल्या कॅन्सरच्या ट्यूमर्सचा (Cancerous Tumours) आकार कमी करण्यात यशस्वी ठरला असल्याचं प्राण्यांवर, तसंच प्री-क्लिनिकल लॅबोरेटरीत केलेल्या प्रयोगात आढळलं आहे. आता माणसांवरही याची चाचणी सुरू झाली आहे.

अमेरिकेतल्या कॅन्सर संशोधन आणि उपचारांबद्दलच्या मोठ्या संस्थांपैकी एक असलेल्या (City of Hope) एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे आपल्या प्रयोगाची माहिती दिली आहे. सिटी ऑफ होप संस्थेतल्या मेडिकल ऑन्कॉलॉजी आणि थेराप्युटिक्स रिसर्च विभागातले प्रमुख संशोधक दानेंग ली यांनी सांगितलं, 'ऑन्कॉलायटिक व्हायरस शरीरातल्या प्रतिकारशक्तीला प्रोत्साहन देऊन कॅन्सरला प्रतिसाद देण्याची आणि मारण्याची क्षमता देऊ शकतात, असं अगोदरच्या संशोधनात आढळलं होतं. तसंच हा व्हायरस अन्य इम्युनोथेरपीजना अधिक प्रतिसाद देण्यासाठीही प्रतिकारशक्तीला प्रोत्साहन देतात. आता इम्युनोथेरपीची ताकद अधिक आजमावण्याची गरज आणि काळ आहे. CF33-hNIS (Vaxinia) या कॅन्सर-किलिंग व्हायरसमध्ये रुग्णांचा कॅन्सरविरुद्धचा लढा अधिक प्रभावी होण्याची क्षमता दिसून येत आहे.'

ज्या कॅन्सर पेशंट्सना सध्याच्या रूढ उपचारपद्धतींमधल्या किमान दोन टप्प्यांतले उपचार दिले गेले आहेत, अशा मेटास्टॅटिक (Metastatic) किंवा अ‍ॅडव्हान्स्ड सॉलिड ट्यूमर्स (Advanced Solid Tumours) असलेल्या पेशंट्सना या व्हायरसचा Low Dose दिला जाणार आहे. हा डोस एक तर थेट ट्यूमरमध्ये इंजेक्शनद्वारे दिला जाणार आहे किंवा इंट्राव्हेनस इंजेक्शनद्वारे दिला जाणार आहे. ही चाचणी सुमारे दोन वर्षं चालणार आहे. त्यादरम्यान अमेरिका आणि ऑस्ट्रेलियातल्या सुमारे १०० पेशंट्सवर उपचार केले जाणार आहेत.

मेटास्टॅटिक आणि शेवटच्या टप्प्यातल्या ट्यूमर्सवर उपचारांसाठी महत्त्वाचा टप्पा या संशोधनामुळे गाठला गेला असल्याचं मत Imugene चे एमडी आणि सीईओ Leslie Chong यांनी व्यक्त केलं.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स