(Image Credit : shape.com)

वर्कआउट किंवा एक्सरसाइज करताना म्युझिक ऐकणं काही नवीन बाब नाहीये. पण गरजेचं हे आहे की, तुम्ही तुम्हाला कसं म्युझिक आवडतं हे समजून घ्या आणि त्या म्युझिकचा आपल्या वर्कआउट रुटीनमध्ये समावेश करा. असं केल्याने एक्सरसाइज करताना तुमचं मन लागेल आणि अधिक एनर्जीने तुम्ही एक्सरसाइज करू शकाल.

वर्कआउटसाठी फायदेशीर म्युझिक 

(Image Credit : popsugar.com)

म्युझिकने आयुष्यातील वेगवेगळ्या प्रकारचे ताण-तणाव, चिंता, काळजी दूर करण्यास मदत मिळते. तेच म्युझिक ऐकत वर्कआउट केल्याने लक्ष केंद्रीत होतं आणि वर्कआउटचा दबावाची जाणीव कमी होते. अशाने १५ मिनिटे एक्सरसाइज अधिक केली जाते. थिरकायला लावणारे बीट म्युझिक असेल तर याने मेंदू अधिक वेगाने काम करतो आणि तुम्हीही त्यामुळे वेगाने एक्सरसाइज करू शकता.

जास्त मेहनतीसाठी मिळते मदत

(Image Credit : atlantamagazine.com)

२०१० मधील एका रिसर्चनुसार, मेलोडिअस म्युझिकच्या तुलनेत फास्ट बीट असलेलं म्युझिक ऐकलं तर भरपूर मेहनतीने एक्सरसाइज करण्यास मदत मिळते. जर तुम्ही १२० ते  १४० बीट्स प्रति मिनिट असलेलं म्युझिक ऐकाल तर याचा तुम्हाला एक्सरसाइज करताना चांगला परिणाम बघायला मिळेल. प्रत्येकांची म्युझिकची एक आपली आवड असते, ज्याने त्यांचा मूड चांगला होतो. काही गाण्यांसोबत आपल्या आठवणी जुळलेल्या असतात, ही गाणी आपल्याला आठवणींच्या जगात घेऊन जातात. 

एकाच वेगाने काम करण्यास मदत 

(Image Credit : hellosensible.com)

तुमच्या वर्कआउट म्युझिकची लय मेंदूची मोटार उत्तेजित करते. याने कधी एक्सरसाइज करताना मेंदूला वेगवेगळे संकेत मिळतात आणि एक्सरसाइज अधिक चांगली करू शकता. म्युझिकमधून तुम्हाला ऊर्जा मिळते. एका गति कायम ठेवण्यास शरीराल मदत मिळते आणि शरीर योग्यप्रकारे काम करतं.

मूड चांगला ठेवणे

(Image Credit : womenshealthmag.com)

२०१३ मध्ये करण्यात आलेल्या  एका रिसर्चनुसार, म्युझिक तुमचा मूड बदलण्यास मदत करतं आणि स्वत:ला ओळखण्यासही मदत करतं. रिसर्चमध्ये सहभागी लोकांना म्युझिक ऐकण्यास सांगून त्यांना विचारात गुंतण्याची संधी देण्यात आली की, ते काय आहेत? आणि त्यांना काय व्हायचं आहे? म्युझिक ऐकून लोकांना नकारात्मक विचारांमधून सुटका मिळते. 


Web Title: Can Listening to Music Improve Your Workout?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.