टोमॅटो खाल्ल्याने खरंच किडनी स्टोन होतो का? वाता कितपत आहे यात तथ्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2024 09:47 IST2024-04-20T09:46:50+5:302024-04-20T09:47:12+5:30
वेगवेगळ्या पद्धतीने टोमॅटोचं सेवन केलं जातं. याचे आरोग्याला अनेक फायदेही मिळतात. पण सोबतच काही नुकसानही होतात. तेच जाणून घेऊ...

टोमॅटो खाल्ल्याने खरंच किडनी स्टोन होतो का? वाता कितपत आहे यात तथ्य
टोमॅटो खाणं भरपूर लोकांना आवडतं. वेगवेगळ्या भाज्या आणि सलादची टेस्ट टोमॅटोमुळे वाढते. वेगवेगळ्या पद्धतीने टोमॅटोचं सेवन केलं जातं. याचे आरोग्याला अनेक फायदेही मिळतात. पण काही लोकांमध्ये असा समज असतो की, टोमॅटो खाल्ल्याने किडनी स्टोन होतो. पण यात किती सत्य आहे हे जाणून घेऊ.
टोमॅटो खाण्याचे फायदे-नुकसान
टोमॅटोमध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट आणि व्हिटॅमिन सी भरपूर असतात. जे इम्यून सिस्टीम मजबूत करतात. सोबतच यातून शरीराला व्हिटॅमिन ए, बी आणि मॅग्नेशिअमसारखे पोषक तत्व मिळतात.
नसा होतात मजबूत
टोमॅटोमध्ये आढळणारं लायकोपीन रक्तवाहिन्यांचं काम चांगलं करून ब्लड प्रेशर सामान्य करण्यास मदत करतं. यातील पोटॅशिअममुळे ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत मिळते.
टोमॅटोचं सेवन कसं करावं?
टोमॅटो शिजवून खाणं चांगलं असतं. ते कच्चे खायचे असतील तर त्यातील बीया काढाव्या. जेणेकरून अॅसिडिटीची समस्या होऊ नये. टोमॅटो थोडे आम्लीय असतात, ज्यामुळे नियमितपणे यांचं सेवन केल्याने अॅसिडिटी होऊ शकते.
वजन होतं कमी
टोमॅटोमध्ये फायबरचं प्रमाण भरपूर असतं आणि कॅलरी कमी असतात. त्यामुळे याने वजन कमी करण्यास मदत मिळते. फायबरमुळे पोट लवकर भरतं आणि कॅलरीचं सेवन कमी होतं.
जास्त टोमॅटो खाल्ल्याने किडनी स्टोनचा धोका?
टोमॅटोमध्ये कॅल्शिअम आणि ऑक्सालेट भरपूर असतात जे पचत नाहीत आणि शरीरातून बाहेरही निघत नाहीत. असं मानलं जातं की, हे मिनरल्स जमा होऊन किडनी स्टोन बनतो. पण काही शोधात सांगण्यात आलं की, असं काही होत नाही.
काय आहे सत्य?
टोमॅटो खाणं तुम्हाला पसंत असेल आणि या गैरसमजामुळे तुम्ही ते खात नसाल तर असं करू नका. टोमॅटोमध्ये ऑक्सालेट असतात पण त्यांचं प्रमाण फार कमी असतं आणि यामुळे किडनी स्टोन बनू शकत नाही. 100 ग्राम टोमॅटोमध्ये केवळ 5 ग्राम ऑक्सालेट असतात. जर टोमॅटो इतकं घातक असतं तर किडनी स्टोन असणाऱ्या लोकांना ते खाणं बंद करण्याचा सल्ला दिला गेला असतो. जर तुम्ही हेल्दी असाल आणि किडनीची कोणतीही समस्या नसेल तर बिनधास्त टोमॅटो खाऊ शकता. पण जर किडनीसंबंधी काही समस्या असेल तर तुम्ही ऑक्सालेटचं सेवन कमी केलं पाहिजे. पालक, बीन्स, रताळ्यांमध्ये ऑक्सालेट भरपूर असतं. अशात हे खाणं टाळलं पाहिजे.
टोमॅटोच्या बियांमुळे किडनी स्टोन होतो का?
टोमॅटोमधधील अॅंटी-ऑक्सिडेंटला लायकोपीन नावाने ओळखलं जातं. हे ऑक्सीडेटिव तणाव कमी करण्यास आवश्यक आहे. ऑक्सीडेटिव तणाव वेगवेगळ्या कारणामुळे होतो. यात डायबिटीस, लठ्ठपणा, हाय ब्लड प्रेशर, प्रदूषण, संक्रमण आणि किडनीवर सूज यांचा समावेश आहे.
या स्थितींमध्ये इतर अवयव प्रभावित होऊ शकतात. पण किडनी सगळ्यात जास्त प्रभावित होतात. कारण लायकोपीन मूत्र संबंधी केंद्रित असतं. टोमॅटो तसे तर नुकसानकारक नसतात. पण सगळ्यात रूग्णांची स्थिती एकसारखी नसते. एक्सपर्टनुसार, टोमॅटो किडनीसाठी नुकसानकारक नाही. उलट एकंदर आरोग्यासाठी याचे फायदे होतात. तरीही काही केसेसमध्ये टोमॅटो नुकसानकारक ठरू शकतं.