शहरं
Join us  
Trending Stories
1
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
2
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
3
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
4
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
5
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
6
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
7
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
8
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
9
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
10
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
11
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
12
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
13
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
14
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
15
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
16
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
17
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
18
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
19
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
20
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
Daily Top 2Weekly Top 5

डोक्यावर चिकटून बसलेला डॅंड्रफ होईल लगेच दूर, कापरासोबत मिक्स करा या 2 गोष्टी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2024 14:06 IST

यावर जर वेळेवर उपचार केले नाही तर डोक्याच्या त्वचेला एलर्जी होण्यापासून ते केसगळतीची समस्या होते.

केसांमध्ये डॅंड्रफ म्हणजे कोंडा होणं कॉमन समस्या आहे. पण हिवाळ्यात ही समस्या जास्तच वाढते. जर तुम्ही सुद्धा ही समस्या दूर करण्यासाठी वेगवेगळे उपाय करत असाल आणि काहीच फायदा झाला नसेल, तर हा उपाय तुमच्या खूप कामात येईल. चांगले आणि सुंदर केस सगळ्यांनाच हवे असतात. पण अनेकदा वातावरण बदलामुळे किंवा चुकीच्या ब्युटी प्रोडक्ट्समुळे डॅंड्रफची समस्या वाढू लागते. यावर जर वेळेवर उपचार केले नाही तर डोक्याच्या त्वचेला एलर्जी होण्यापासून ते केसगळतीची समस्या होते.

हिवाळ्यात का वाढते ही समस्या

बदलत्या वातावरणात अनेक चांगल्या गोष्टींसोबतच अनेक समस्याही येतात. खासकरून हिवाळ्यात जेव्हा आपण गरम पाण्याने आंघोळ करतो तेव्हा ते आपल्या त्वचेसोबतच आपल्या डोक्याच्या त्वचेमधून ऑइल नष्ट करतं. ज्यामुळे डोक्याची त्वचा ड्राय होणं सुरू होतं. नंतर त्वचेच्या पापड्या पडू लागतात. त्यानंतर केसगळती सुरू होते. 

अजूनही काही कारणे

केवळ ड्राई किंवा ऑयली त्वचा नाही तर सेबोरहाइक आणि मलेसेजियासारख्या फंगल इन्फेक्शनमुळेही केसात डॅंड्रफ होतं. अनेकदा हार्मोनल बदलांमुळे डोक्याची त्वचा कोरडी होते. तसेच हेल्दी डाएट ज्यात प्रोटीन, आयर्न, फायबर व हेल्दी फॅट्स कमी झाल्यानेही केस कमजोर होऊ लागतात. तसेच डोक्याची त्वचाही खराब होते. अशात काही अशा नॅचरल गोष्टी आहेत ज्यांद्वारे तुम्ही सहजपणे डॅंड्रफची समस्या दूर केली जाऊ शकते. 

कापूरासोबत तेल

इंस्ट्राग्रामच्या एका रीलमध्ये डॅंड्रफची समस्या दूर करण्याचा एक उपाय सांगण्यात आला आहे. यासाठी तुम्हाला 2 ते 3 कापरं बारीक करून त्यात अर्ध्या लिंबाचा रस टाका आणि चांगलं मिक्स करा. मग यात एक कप गरम पाणी टाकून खोबऱ्याचं तेल मिक्स करा. आठवड्यातून तीन वेळा हे मिश्रण 45 मिनिटांसाठी केसांना लावा. नंतर माइल्ड शाम्पूने केस धुवा. याने तुम्हाला आराम मिळेल.

तेलामुळेही होतो फायदा

मुळात भीमसेनी कापरामध्ये अॅंटी-फंगल तत्व असतात. जे फंगसची ग्रोथ वाढणं रोखण्यास मदत करतात. सोबतच यातील थंड तत्वांमुळे डोक्याची त्वचाही थंड होते, त्यावर जळजळ कमी होते. जेव्हा हा कापूर आपण डोक्यावर लावतो तेव्हा हेअर फोलिकल्स उघडण्यासही मदत मिळते. तेच लिंबाच्या रसामुळे डोक्याच्या त्वचेचं पीएच लेव्हल बॅलन्स करून फंगसची  ग्रोथ रोखण्यास मदत मिळते. 

टॅग्स :Hair Care Tipsकेसांची काळजीHealth Tipsहेल्थ टिप्स