California woman swallowed engagement ring in dream find actually did | चोरांपासून वाचवण्यासाठी स्वप्नातच गिळली अंगठी; सकाळी उठून पाहते तर...
चोरांपासून वाचवण्यासाठी स्वप्नातच गिळली अंगठी; सकाळी उठून पाहते तर...

प्रत्येकासाठीच आपल्या साखरपुड्याची अंगठी फार महत्त्वाची असते. आपण ज्या व्यक्तीची आयुष्यभराचा सोबती म्हणून निवड करतो. त्याने दिलेली ती पहिली भेट असते. ती अंगठी अनेकजण प्राणापलिकडे जपत असतात. पण आपली हिच अंगठी वाचवण्याच्या नादात अमेरिकेतील महिलेने जे केलं ते ऐकून तुम्हीही हैराण व्हाल.  आता तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल की, असं केलं तरी काय या महिलेने? अहो, या महिलेने चोरांपासून आपली अंगठी वाचवण्यासाठी चक्क ती गिळून टाकली. 

अमेरिकेत राहणारी एक महिला आणि तिचा पार्टनर ट्रेनमधून प्रवास करत होते. तेवढ्याच त्या ट्रेनमध्ये काही चोर शिरले. त्यांच्यापासून आपली अंगठी वाचवण्यासाठी त्या महिलेने ती चक्क गिळून टाकली. यामधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ही घटना वास्तवात घडली नसून महिलेला पडलेलं स्वप्न होतं. पण तिच्यासोबत घडलेली सर्वात दुर्दैवी घटना म्हणजे, तिने स्वप्नात घडलेल्या घटनेमुळे अंगठी स्वप्नात नाहीतर खरीखुरी गिळली. त्यानंतर तातडीने महिलेना रूग्णालयात दाखल करून तिच्यावर सर्जरी करण्यात आली. 

कॅलिफोर्नियामध्ये राहणाऱ्या 29 वर्षांच्या जेना इवंस यांना पडलेल्या वाईट स्वप्नानंतर जाग आली तेव्हा तिने पाहिलं की, तिची हिऱ्यांची अगठी तिच्या हातामध्ये नव्हती. घडलेली घटना सांगण्यासाठी त्यांनी आपल्या पार्टनरला उठवले आणि दोघेही तातडीने रूग्णालयात गेले. 

मागील आठवड्याच्या शेवटी ही घटना घडली होती. जेव्हा एक्स-रे स्कॅन करण्यात आलं तेव्हा इवांसाच्या पोटामध्ये 2.4 कॅरेटती अंगठी दिसून आली. इवांसा यांनी सांगितल्यानुसार, जेव्हा तिच्या पोटातून अंगठी काढण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. त्याआधी तिला एका  फॉर्मवर सही करण्यास सांगण्यात आलं. त्यावेळी मात्र तिला फार रडू आलं होतं.'

दरम्यान, योग्य वेळेत उपचार केल्यामुळे इवांसाच्या पोटातू अंगठी काढण्यात डॉक्टरांना यश आलं. आता इवांसाच्या तब्ब्येतीमध्ये हळूहळू सुधारणाही होत आहे. 

 


Web Title: California woman swallowed engagement ring in dream find actually did
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.