(Image Credit : DailyMail)
दातांच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष देणारे आणि तोंडाच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या लोकांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण एका रिसर्चमधून असा दावा करण्यात आला आहे की, जे लोक दिवसातून तीन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा दातांची स्वच्छता करतात, त्यांना हृदयासंबंधी आजारांचा धोका अनेक पटीने कमी होतो.
अभ्यासकांनुसार, एका दिवशी कमीत कमी तीन वेळा ब्रश करणाऱ्या लोकांमध्ये आर्टिअल फिब्रिलेशनची शक्यता १० टक्के आणि हार्ट फेल्युअरची शक्यता १२ टक्क्यांनी कमी होते. सोबतच हार्ट बीट अनियमित होण्याचा धोकाही तीन वेळा ब्रश केल्याने कमी होतो. ही बाब साउथ कोरियात करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून समोर आली आहे.
ओरल हायजीन म्हणजे तोंडाची स्वच्छता याबाबत काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून समोर आले की, तोंडाच्या स्वच्छतेची काळजी घेतली गेली नाही तर तोंडात तयार होणारे बॅक्टेरिया हृदयासंबंधी आजाराचं कारण ठरू शकतात. यूरोपियन जर्नल ऑफ प्रिवेंटिव्ह कार्डिऑलॉजीमध्ये प्रकाशित या रिसर्चनुसार, रिसर्चमध्ये हे स्पष्ट झालं आहे की, ओरल हायजीन आणि हृदयाचं आरोग्य यात थेट संबंध आहे.
हा रिसर्च कोरियन नॅशनल हेल्थ इन्शुरन्स द्वारे साधारण १६ लाख लोकांच्या डेटावर आधारित प्रकाशित करण्यात आला. ज्या लोकांवर हा रिसर्च करण्यात आला, त्या सर्वांचं वय ४० ते ७९ वर्षे दरम्यान होतं. रिसर्चदरम्यान सर्वच लोकांची हाइट, वजन, आजार, लाइफस्टाईल, ओरल हेल्थ हायजीन आणि इतरही काही टेस्ट करण्यात आल्या. सोबतच जेंडर आणि सोशिओइकॉनॉमिक स्टेट्स, रेग्युलर एक्सरसाइज, अल्कोहोलची सवय, बॉडी मास इंडेक्स, हायपरटेन्शन सारख्या डिसऑर्डरची टेस्टही करण्यात आली.
या रिसर्चमधून असेही आढळले की, दिवसातून कमीत कमी ३ वेळ ब्रश केल्याने तोंडात तयार होणारे घातक बॅक्टेरिया वेगाने कमी होतात. हे ते बॅक्टेरिया असतात जे दात आणि हिरड्यांच्या स्पेसमध्ये वाढतात. हे बॅक्टेरिया वेगवेगळ्या प्रकारे हृदयाच्या संपर्कात आल्याने वेगवेगळे आजार होऊ शकतात. ज्यात हार्ट फेल्युअल आणि हार्ट बीट अनियमित होणे यांचा समावेश आहे.