'ती' आई होती म्हणून... ब्रेन डेड होऊनही 4 महिने पोटात वाढवलं बाळ; पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2019 16:36 IST2019-09-05T16:35:48+5:302019-09-05T16:36:18+5:30
एका आईचं आपल्या बाळासोबत एक अनोखं नातं असतं. आई आपल्या बाळाला कधीच कोणत्याही संकटात पाहू शकत नाही. आज आम्ही तुम्हाला एका अशाच आईची गोष्ट सांगणार आहोत. एक अशी आई जिने ब्रेन डेड झाल्यानंतरही 4 महिने आपल्या बाळाचा आपल्या गर्भाशयात सांभाळ केला.

'ती' आई होती म्हणून... ब्रेन डेड होऊनही 4 महिने पोटात वाढवलं बाळ; पण...
एका आईचं आपल्या बाळासोबत एक अनोखं नातं असतं. आई आपल्या बाळाला कधीच कोणत्याही संकटात पाहू शकत नाही. आज आम्ही तुम्हाला एका अशाच आईची गोष्ट सांगणार आहोत. एक अशी आई जिने ब्रेन डेड झाल्यानंतरही 4 महिने आपल्या बाळाचा आपल्या गर्भाशयात सांभाळ केला. पण, बाळाला जन्म दिल्यानंतर 3 दिवसांतच तिची प्राणज्योत मलावली.
फॉक्स न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, सर्वांना आश्चर्यचकित करणारी घटना चेक रिपब्लिकमधील बर्नो येथे घडली आहे. या घटनेमध्ये पंधरा आठवड्यांची वर्षांच्या गर्भवती आईचं ब्रेन डेड होऊनही तिनं तिच्या बाळाला 4 महिने आपल्या पोटामध्ये सांभाळलं.
ब्रेन स्ट्रोकमुळे झालं होतं ब्रेन डेड
जवळपास 4 महिन्यांआधी ब्रेन स्ट्रोकमुळे पीडित असणाऱ्या 27 वर्षीय महिलेला बर्नो यूनिवर्सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. स्ट्रोकनंतर महिलेचं ब्रेन पूर्णपणे डेड झालं होतं. परंतु, तिच्या पोटामध्ये 15 आठवड्यांचं भ्रूण वाढत होतं. डॉक्टरांनी त्या महिलेला आर्टिफिशियल लाइफ सपोर्ट सिस्टम वर ठेवलं होतं. यादरम्यान बाळाच्या विकासासाठी डॉक्टर्स महिलेची हालचाल करत असतं. काही दिवसांपूर्वीच ऑपरेशनच्या मदतीने महिलेने सव्वा दोन किलोंच्या एका निरोगी बाळाला जन्म दिला. बाळाच्या जन्मानंतर कुटुंबियांच्या संमतीने महिलेचा आर्टिफिशियल लाइफ सपोर्ट काढून टाकला. त्यानंतर 3 दिवसांनी त्या महिलेचा मृत्यू झाला. जगातील ही पहिली घटना आहे ज्यामध्ये एका ब्रेन डेड महिलेने एका हेल्दी बाळाला जन्म दिला.
तुम्हाला माहीत आहे का ब्रेन डेड म्हणजे नक्की काय?
ब्रेन डेड एक अशी स्थिती असते, ज्यामध्ये व्यक्तीचा मेंदू पूर्णपणे काम करणं बंद करतो. पण शरीराचे इतर अवयव योग्य पद्धतीने काम करत असतात. अशा परिस्थितीमध्ये व्यक्ती ठिक होण्याची शक्यता फार कमी असते. व्यक्तील आर्टिफिशियल लाइफ सपोर्ट सिस्टिमवर ठेवलं नाही तर काही तासांतच व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. ब्रेन डेड झालेल्या व्यक्तीची फुफ्फुसं, हृदय आणि इतर शरीराचे अवयव दान करता येतात.
काय असतं ब्रेन डेड?
- मेंदूला जर एखादी गंभीर दुखापत झाली असेल किंवा बंदूकीची गोळी लागली असेल तर ब्रेन डेड होतं.
- ब्रेन स्ट्रोकमुळेही ब्रेन डेड होतं.
- पाण्यामध्ये बुडल्यानंतर किंवा हृदयविकाराचा झटका आल्यानंतरही ब्रेन डेड होतं.
- मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्यास किंवा ऑक्सिजनची कमतरता भासल्यास ब्रेन डेड होतं.