सकाळी झोपेतून उठल्यावर धुसर दिसणं घातक, रिसर्चमधून धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 07:38 PM2024-04-26T19:38:58+5:302024-04-26T19:39:09+5:30

एका नव्या स्टडीमध्ये दावा करण्यात आला आहे की, डोळे खराब होणं 12 वर्षानी होणाऱ्या मेंदुच्या आजाराचा इशारा असू शकतो.

Blurry vision in morning can be first warning sign or symptom of dementia alzheimers brain disease | सकाळी झोपेतून उठल्यावर धुसर दिसणं घातक, रिसर्चमधून धक्कादायक खुलासा

सकाळी झोपेतून उठल्यावर धुसर दिसणं घातक, रिसर्चमधून धक्कादायक खुलासा

काही लोकांना सकाळी डोळे उघड्यावर काही सेकंदासाठी धुसर दिसतं. अनेकदा धुसर दिसण्यासोबत डोळ्यातून पाणीही येऊ लागतं. दिसण्यात समस्या किंवा नजर कमजोर होणं इत्यादी आय डिजीजची लक्षण असतात. पण तुम्ही विचार केलाय का की, हे एखाद्या घातक आजाराचं लक्षणही अशू शकतं. एका नव्या स्टडीमध्ये दावा करण्यात आला आहे की, डोळे खराब होणं 12 वर्षानी होणाऱ्या मेंदुच्या आजाराचा इशारा असू शकतो.

हा रिसर्च Loughborougsh University च्या अभ्यासकांनी केला. यात इंग्लंडच्या नॉर्फोल्कच्या 8623 हेल्दी लोकांवर अभ्यास करण्यात आला. यात आढळून आलं की, डोळ्यांच्या संवेदनशीलतेने 12 वर्षाआधीच डिमेंशियाची माहिती मिळते.

कसा केला अभ्यास?

व्हिज्युअल सेंसिटिविटी बघण्यासाठी लोकांना एक त्रिकोण बघण्यास सांगण्यात आलं. हे स्क्रीनवर हलत्या डॉट्समध्ये शोधायचं होतं. यात आढळून आलं की, ज्या लोकांनी हे उशीरा पाहिलं त्यांच्यात 12 वर्षाच्या आतच डिमेंशियाचा आजार विकसित होऊ लागला.

डिमेंशिया आणि डोळ्यांचा संबंध

रिसर्चमध्ये सांगण्यात आलं की, नजर कमजोर होणं मेंदुची क्षमता कमी होण्याचं लक्षण आहे. अल्झायमर-डिमेंशियाचं कारण ठरणारं टॉक्सिक एमालॉइड प्लाक सगळ्यात आधी मेंदुच्या त्या भागात जमा होतं जिथून नजर आणि आय हेल्थ कंट्रोल केली जाते. त्यामुळे डोळ्यांच्या या आजाराची माहिती मेमरी टेस्टच्या माध्यमातूनही मिळवता येते.

डिमेंशिया-अल्जाइमर म्हणजे काय?

डिमेंशिया मेंदू आणि स्मरणशक्तीशी संबंधित आजारांचा समूह आहे. ज्यात अल्झायमर सगळ्यात कॉमन समस्या आहे.  हा आजार वयोवृद्धांना होतो, पण ही वय वाढण्याची सामान्य प्रक्रिया नाही. यात रूग्ण आपला चेहरा, नाव आणि नाती विसरून जातो. बोलताही येत नाही. घराचा पत्ताही विसरतात.

काय कराल उपाय?

अभ्यासकांनी विचार केला की, जेव्हा डोळ्यांची कमजोरी स्मरणशक्ती कमी होण्याचं लक्षण असू शकतं. तेव्हा डोळ्यांच्या मदतीने मेमरी वाढवली जाऊ शकते का? यासाठी रिसर्च केला जात आहे. पण आधीच झालेल्या काही रिसर्चमधून समोर आलं की, जे लोक जास्त डोळे हलवतात किंवा उघडझाप करतात त्यांची स्मरणशक्ती इतरांच्या तुलनेत अधिक चांगली असते.

कुणाची स्मरणशक्ती जास्त चांगली 

अभ्यासकांनी सांगितलं की, असं आढळून आलं आहे की, जे लोक टीव्ही बघणे किंवा पुस्तकं वाचणे अशी कामे जास्त करतात त्यांची स्मरणशक्ती जास्त चांगली असते. कारण यात डोळे पुन्हा पुन्हा इकडे-तिकडे फिरवावे लागतात. पण जेव्हा डिमेंशियाच्या रूग्णांकडून असं करून घेण्यात आलं तेव्हा काही खास पभाव आढळून आला नाही.

Web Title: Blurry vision in morning can be first warning sign or symptom of dementia alzheimers brain disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.