दिलासादायक! कोरोनाच्या उपचारात प्रभावी ठरत आहे 'हे' औषध; ३ दिवसात रुग्ण होऊ शकतात बरे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 11:16 AM2020-06-08T11:16:08+5:302020-06-08T11:17:08+5:30

अमेरिकेत सध्या कोरोनावर मात करत असलेल्या औषधांवर परिक्षण सुरू आहे.

Blood cancer medicine may use for covid 19 treatment patient got relief only in 3 days | दिलासादायक! कोरोनाच्या उपचारात प्रभावी ठरत आहे 'हे' औषध; ३ दिवसात रुग्ण होऊ शकतात बरे

दिलासादायक! कोरोनाच्या उपचारात प्रभावी ठरत आहे 'हे' औषध; ३ दिवसात रुग्ण होऊ शकतात बरे

Next

कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे जगभरातील २०० पेक्षा देश प्रभावित झाले आहेत. अमेरिका, स्पेन, ब्राजिल, ब्रिटेन या देशातील स्थिती गंभीर आहे. भारतात सुद्धा दिवसेंदिवस कोरोनाच संक्रमण वाढत जात आहे. आतापर्यंत कोरोनाची लस सापडेली नाही. गंभीर आजारात वापरात असलेल्या औषधांचा वापर कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी केला जात आहे. अमेरिकेत सध्या कोरोनावर मात करत असलेल्या औषधांवर परिक्षण सुरू आहे.

दवा (सांकेतिक तस्वीर)

श्वसनक्रिया तसंच रोगप्रतिकारकशक्तीवर नियंत्रण

नॅशनल कॅन्सर इंस्टीट्यूटच्या संशोधकांनी दावा केला आहे की, कॅन्सरच्या औषधामुळे कोरोनाच्या संक्रमणाची तीव्रता  कमी होऊ शकते.  तसंच कोरोनाच्या उपचारांत मदत मिळू शकते. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार कॅन्सरच्या औषधाने संक्रमित रुग्णांची श्वास घेण्याची समस्या कमी केली जाऊ शकते. त्याद्वारे रोगप्रतिकारकशक्तीची क्षमता वाढवता येऊ शकते. 

रिसर्च

सायंस इम्यूनोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या शोधानुसार कॅन्सरचे औषधं एकॅलब्रूटिनिब' याने कोरोना रुग्णांमधील बीटीके प्रोटीन म्हणजेच ब्रूटॉन टायरोसिन काइनेज ब्लॉक करता येऊ शकतं. जेव्हा इम्यून सिस्टिम जास्त एक्टिव्ह होते तेव्हा शरीरात संक्रमण रोखण्यापेक्षा सूज येण्याचं कारण ठरू शकते. इम्यून सिस्टिममध्ये सायटोकाइनिन प्रोटीन म्हणजेच वैद्यकिय भाषेत याला ब्रूटॉन टायरोसिन काइनेज असं म्हणतात. कॅन्सरच्या औषधाने  कोरोना रुग्णांमधील प्रोटीन्सना ब्लॉक करता येऊ शकतं.

दवा (सांकेतिक तस्वीर)

संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना रुग्णांमध्ये सायटोकाइनिन प्रोटीन जास्त प्रमाणात रिलिज होतं. त्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती कमी होऊ शकते. फुफ्फुसांना नुकसान पोहोचू शकतं. तसंच ऑक्सिजनची कमतरता भासल्यामुळे सुज येते. 

Coronavirus

व्हेंटीलेटरवर असलेल्या आठमधील चार रुग्णांना सपोर्टवरून हटवण्यात आलं आहे.  रुग्णांचे रिपोर्ट आल्यानंतर समोर आले की त्याच्या रक्तातील प्रोटीन इंटरल्यूकिन-6 चा स्तर वाढला होता.  शरीरातील सुजेचं कारण ठरणारं हे प्रोटीन कॅन्सरची औषध दिल्यानंतर नियंत्रणात आले. सायन्स इम्यूनोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या माहितीनुसार प्रॅक्टिससाठी या औषधाचा वापर केला जात आहे. कॅन्सरच्या या औषधाचा वापर रुग्णांवर करण्यात येत आहे. रुग्णाच्या शारीरिक स्थितीवर त्यांची रिकव्हर होण्याची गती अवलंबून असते. 

लॉकडाऊननंतर आता ऑफिसला जायच्या विचारात असाल; तर संसर्गापासून 'असा' करा बचाव

लॉकडाऊननंतर आता ऑफिसला जायच्या विचारात असाल; तर संसर्गापासून 'असा' करा बचाव

Web Title: Blood cancer medicine may use for covid 19 treatment patient got relief only in 3 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.