लॉकडाऊननंतर आता ऑफिसला जायच्या विचारात असाल; तर संसर्गापासून 'असा' करा बचाव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 09:57 AM2020-06-08T09:57:46+5:302020-06-08T10:01:38+5:30

आपल्यामुळे आपल्या घरच्यांना संसर्ग होऊ शकतो. म्हणून घराबाहेर पडत असताना काही गोष्टींची खबरदारी घेणं गरजेचं आहे.

Dos and donts of resuming work in coronavirus pandemic | लॉकडाऊननंतर आता ऑफिसला जायच्या विचारात असाल; तर संसर्गापासून 'असा' करा बचाव

लॉकडाऊननंतर आता ऑफिसला जायच्या विचारात असाल; तर संसर्गापासून 'असा' करा बचाव

googlenewsNext

(image credit- Track.in)

कोरोना व्हायरसचं थैमान गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण जगभरात पसरलेलं आहे. भारतातही मार्च महिन्यात लॉकडाऊन सुरू झाले होते. कारण कोरोनाची लागण होत असलेल्यांची आकडेवारी  दिवसेंदिवस वाढत होती. सध्या लॉकडाऊनच्या नियमांमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे.  सर्वच ठिकाणी दोन महिने घरी बसलेला कर्मचारीवर्ग हळूहळू ऑफिसला जायला सुरूवात करणार आहे. अशात आपल्यामुळे आपल्या घरच्यांना संसर्ग होऊ शकतो. म्हणून घराबाहेर पडत असताना काही गोष्टींची खबरदारी घेणं गरजेचं आहे.

सरकारद्वारे देण्यात  आलेल्या नियमांचे पालन करायला हवे. थर्मल स्‍कॅनिं आणि सॅनिटाइजेशनचा यात समावेश आहे. याशिवाय सोशल डिस्टेंसिंगचं पालन आणि तोंडाला मास्कने झाकून ठेवणं.

बाहेर पडत असताना स्वतःसोबत हॅण्डसॅनिटाजर आणि पेपरसोप ठेवणे.

घरातून बाहेर निघताना मास्कचा वापर करणं गरजेचं आहे. 

आपला डबा, पाणी आणि औषधं सोबत ठेवणं

आपल्यासोबत गरजेच्या वस्तू चार्जर, इअरफोन्स, पॉवर बॅक, लॅपटॉपसोबत ठेवा जेणेकरून इतरांकडून मागण्याची गरज भासणार नाही.

जर तुम्हाला सतत चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असेल तर घरातून निघताना टि बॅगसोबत घेऊन जा.
कार, बाईक स्वच्छ साफ  करून वापरा. 

ऑफिसला जाताना गरज नसताना काहीही विकत घेण्यासाठी थांबू नका. 

रस्त्यात फेसमास्क काढू नका. तोंडाला सतत हात लावू नका.

ऑफिसमध्ये काम करताना अशी घ्या काळजी

काम करत असताना आपला मास्क कुठेही काढू नका.

लॅपटॉप किंवा मोबाईल ठेवण्याच्या आधी आपली डेस्क साफ करून घ्या.

सहकर्मचारीवर्गाशी ६ फुटांचे अंतर ठेवून मगच व्यवहार करा. 

शक्य असल्यास लिफ्टचा वापर करू नका, कारण लिफ्टचा वापर केल्यामुळे तुमचा लिफ्टच्या बटणांशी संपर्क येऊ शकतो. 

लिफ्टमध्ये तीनपेक्षा जास्त लोक असतील तर त्या लिफ्टमध्ये जाणं टाळा.

ऑफिसमधून घरी आल्यानंतर अशी घ्या काळजी

घरी आल्यानंतर तुमचे सगळे कपडे वॉशिंग मशिनमध्ये धुवायला टाका

अंघोळ करण्याआधी कोणत्याही वस्तूला स्पर्श करू नका. कोणाशी बोलू नका.

मास्क वॉशेबल असल्यास धुवून टाका. 

सावधान! व्हिडीओ कॉलमुळे होत आहे आरोग्याचं मोठं नुकसान; 'अशी' घ्या काळजी

कोरोनाचे लक्षणं असू शकतात घश्यातील वेदना; सर्दी, टॉन्सिल्सपासून 'असा' करा बचाव

Web Title: Dos and donts of resuming work in coronavirus pandemic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.