ओवा आणि काळ्या मिठाच्या मिश्रणानं कमी होईल पोटावरील चरबी, जाणून घ्या कसा कराल वापर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 16:02 IST2025-01-09T16:02:06+5:302025-01-09T16:02:53+5:30

Belly Fat Home Remedies : जर तुम्हीही पोटवर वाढलेल्या चरबीनं वैतागलेले असाल आणि तुम्हाला ती कमी करायची असेल तर याचा गोष्टींचा योग्य वापर केला पाहिजे.

black salt and carom seed can reduce belly fat | ओवा आणि काळ्या मिठाच्या मिश्रणानं कमी होईल पोटावरील चरबी, जाणून घ्या कसा कराल वापर!

ओवा आणि काळ्या मिठाच्या मिश्रणानं कमी होईल पोटावरील चरबी, जाणून घ्या कसा कराल वापर!

Belly Fat Home Remedies : काळं मीठ आणि ओव्याचं मिश्रण पोटावरील चरबही कमी करण्यासाठी प्रभावी आणि फार जुना घरगुती उपाय मानला जातो. या दोन्ही गोष्टींच्या मदतीनं शरीरातील फॅट कमी केलं जातं. जर तुम्हीही पोटवर वाढलेल्या चरबीनं वैतागलेले असाल आणि तुम्हाला ती कमी करायची असेल तर याचा गोष्टींचा योग्य वापर केला पाहिजे. अशात या मिश्रणाचा चरबी कमी करण्यात कसा फायदा मिळतो, हे जाणून घेऊया.

ओवा आणि काळ्याचा मिठाचा कसा कराल वापर?

ओवा आणि काळं मीठ पोट साफ करण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी मदत करतं. ओव्यात अ‍ॅंटी-इन्फ्लेमेटरी, अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्ससारखे गुण असतात, जे बद्धकोष्ठता, अ‍ॅसिडिटी दूर करतात. तसेच यांच्या मदतीनं पोटावरील चरबी कमी करण्यासही मदत मिळते.

ओव्यानं मेटाबॉलिज्म बूस्ट होतं, ज्यामुळे कॅलरी बर्न होतात. काळं मीठ पोटावरील चरबी कमी करण्यास मदत करतं. तसेच काळ्या मिठामुळे भूकही कंट्रोल होते, ज्यामुळे तुम्ही ओव्हरईटिंगपासूनही वाचता. अशात तुम्हाला वजन कंट्रोलमध्ये ठेवण्यास मदत मिळते.

ओव्यामध्ये अ‍ॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात, जे शरीरात सूज कमी करतात. सोबतच पोटावरील चरबी कमी करण्यासही मदत मिळते. या दोन्ही गोष्टींचं मिश्रण तयार करण्यासाठी १ चमचा ओवा आणि थोडं काळं मीठ आणि एक ग्लास पाणी घ्या. यांचं चांगलं मिश्रण तयार करा आणि एक एक घोट प्या. हे पाणी तुम्ही नियमितपणे प्याल तर काही दिवसात तुम्हाला फरक दिसेल.

पोटावरील चरबी कमी करण्याचे उपाय

पोटावरील चरबी केवळ काळं आणि ओव्याच्या मदतीनं कमी होणार नाही. यासाठी फळं, भाज्या, प्रोटीन आणि कमी कॅलरी असलेले पदार्थ खावेत. त्याशिवाय रोज एक्सरसाईज करणं टाळू नये. जसे की, योगा, कार्डिओ, वॉकिंग, रनिंग इत्यादी. काळं मीठ जास्त प्रमाणात खाल्लं तर आरोग्याचं नुकसानही होऊ शकतं. त्यामुळे ते कमी प्रमाणात खावं. खासकरून ब्लड प्रेशरच्या रूग्णांनी. 

Web Title: black salt and carom seed can reduce belly fat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.