आनंदी राहण्याचा फंडा काय आहे? हा तुम्हाला समजला तर जीवनात कधीच येणार नाही निराशा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2020 11:33 IST2020-01-18T11:24:26+5:302020-01-18T11:33:11+5:30
जर तुम्हाला नेहमी आनंदी राहण्याचा फंडा समजू शकला तर तुमचं जीवन सफल झालं म्हणून समजा. आनंदी राहण्याचे वेगवेगळे अर्थ समोर येतात.

आनंदी राहण्याचा फंडा काय आहे? हा तुम्हाला समजला तर जीवनात कधीच येणार नाही निराशा!
(Image Credit : heartratezone.com)
जर तुम्हाला नेहमी आनंदी राहण्याचा फंडा समजू शकला तर तुमचं जीवन सफल झालं म्हणून समजा. आनंदी राहण्याचे वेगवेगळे अर्थ समोर येतात. पण सुरूवातीच्या रिसर्चमधून समोर आलं आहे की, आनंदी राहण्याचा अर्थ केवळ चांगलं वाटणे इतकाच नाही तर याचे आरोग्यालाही अनेक फायदे होतात. अशात तुम्हाला नेहमी आनंदी राहण्याचा फंडा माहीत असला पाहिजे. आज आम्ही तुम्हाला या लेखात आनंदी राहण्याचा फंडा सांगणार आहोत.
आनंद काय आहे?
आनंदाबाबत अजूनही तज्ज्ञांमध्ये एकमत नाही, पण तरी सुद्धा आनंद एक अशी स्थिती आहे ज्यात तुमच्या मनाला आणि मेंदूल संतुष्टी मिळते. एखादी गोष्ट मिळवल्यानंतर येणारा अनुभवही एक आनंदच आहे. जेव्हा आपला मेंदू आनंदी राहतो तेव्हा शरीरात काही प्रकारचे हार्मोन्स रिलीज होतात. यांचा आनंदी राहण्याशी खोलवर संबंध आहे. डोपामाइन आणि सेरोटोनिन हार्मोन्स मेंदूत रिलीज झाल्यावर आपल्याला आनंदाची जाणीव होते.
डोपामाइन काय आहे?
डोपामाइन एक असा हार्मोन आहे ज्याने तुम्हाला लक्ष केंद्रीत करणे, सूचना लक्षात ठेवणे, झोपेची गुणवत्ता यांना प्रभावित करतो. कोणतंही उद्दिष्ट मिळवल्यावर नेहमीच आपल्या शरीरात डोपामाइन रिलीज होतात. एखादं काम वेगाने आणि कुशलतेने करण्यात या हार्मोनची भूमिका महत्वाची असते.
आपल्या शरीराला हे माहीत असतं की, जर एखादं उद्दिष्ट पूर्ण केलं तर तुमच्या मेंदूत डोपामाइन हार्मोन रिलीज होतात, ज्याने तुम्हाला संतुष्टी आणि आनंदाची जाणीव होते. हे केवळ मोठी उद्दिष्ट्ये मिळवल्यावर होतं असं नाही तर छोट्या छोट्या गोष्टींवेळीही होतं.
डोपामाइनमुळे तुम्हाला आनंद आणि ऊर्जावान असल्याची जाणीव होते. ज्या लोकांमध्ये डोपामाइनचं प्रमाण कमी असतं, त्यांना डिप्रेशन किंवा मूडसंबंधी वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. अशा लोकांना कामावर लक्ष केंद्रीत करण्याची समस्या होते. त्यामुळे शरीरात डोपामाइनचं प्रमाण वाढवणं हाच आनंदी राहण्याचा फंडा आहे.
सेरोटोनिन काय आहे?
सेरोटोनिन एक असा हार्मोन आहे जो मेंदूसोबतच आतड्यांमध्येही तयार होतो. काही वैज्ञानिक या हार्मोनला हॅप्पी हार्मोन म्हणतात. कारण याचा संबंध तुमच्या मूडवर अवलंबून असतो. डिप्रेशनमध्ये असलेल्या लोकांमध्ये सेरोटोनिनचं प्रमाण फार कमी आढळून येतं. तसेच ज्या लोकांमध्ये सेरोटोनिन अधिक असतं ते आनंदी असतात.
आनंदी राहण्याचा फंडा
हेल्दी लाइफस्टाईल फॉलो करा
आनंदी राहण्यासाठी हेल्दी लाइफस्टाईल फॉलो करणं फार गरजेचं आहे. चांगल्या सवयी आपल्या संपूर्ण आरोग्यासाठी फार महत्वपूर्ण असतात. आनंदी राहण्यासाठी तुम्ही आहारात फळांचा, भाज्यांचा आणि कडधान्यांचा जास्तीत जास्त समावेश करावा. यासंबंधी ७ हजार लोकांवर करण्यात आलेल्या रिसर्चमधून समोर आलं आहे की, आनंदी राहणारे ४७ टक्के वयस्क कमी आनंदी राहणाऱ्या लोकांच्या तुलनेत अधिक जास्त फळं आणि भाज्या खातात. फळं आणि भाज्यांचा आरोग्याला वेगवेगळ्या दृष्टीने फायदा होतो. याने डायबिटीस, स्ट्रोक आणि हार्टसंबंधी आजारांचा धोका कमी होतो.
(Image Credit : shape.com)
या रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, आनंदी राहणारे ३३ टक्के लोक शारीरिक रूपाने सक्रिय राहतात. हे लोक एका आठवड्यातून १० तासांपेक्षा अधिक शारीरिक रूपाने सक्रिय राहतात. नियमितपणे शारीरिक हालचाल केल्याने हाडे मजबूत होतात आणि ऊर्जा मिळते.
तसेच जास्तीत जास्त एक्सरसाइज करण्याचा प्रयत्न करा. एक्सरसाइज केल्याने एंडॉर्फिसचं प्रमाण वाढतं ज्याने तुमचा मूड चांगला राहतो. त्यामुळेच तुम्हाला मार्केटमध्ये फिरताना किंवा एक्सरसाइज करताना आनंदाची जाणीव होते.
दिवस संपण्यापूर्वीच स्वत:ला करा शांत
आनंदी राहण्याचा फंडा फार काही कठिण नाही. आनंदी राहण्याची पद्धत छोट्या छोटया सवयींशी जुळली आहे. जर तुम्ही दिवसभर चिडचिड करत असाल किंवा कशामुळे तुम्हाला राग येत असेल तर हा राग दुसऱ्या दिवसापर्यंत ठेवू नका. झोपण्याआधी या नकारात्मक गोष्टी डोक्यातून काढून टाका.
एकाएकी मोठे गोल्स ठरवू नका
आनंदी राहण्याचा हा फंडा सांगतो की, तुम्ही हळूहळू तुमचे उद्दिष्ट पूर्ण करा. छोट्या छोट्या गोष्टी करूनच तुम्हाला मोठ्या गोष्ट मिळतील. आनंदी राहण्याच्या या पद्धतीत या छोट्या छोट्या गोष्टींची गंभीरता समजून घेणे फार महत्वाचे आहे.
सकारात्मक विचार करा
तुम्ही आनंदी आहात किंवा नाही हे तुमच्या मनस्थितीवर आणि विचारांवर अवलंबून असतं. एकीकडे तुमच्या हातात यश आहे आणि दुसरीकडे तुम्ही संतुष्ट नसाल, आणि तुमच्या डोक्यात यापेक्षा अधिक यश मिळवण्याची इच्छा असेल. या स्थितीत तुम्ही सकारात्मक विचार करत नाहीत. जर तुम्ही सकारात्मक विचार कराल तर तुमच्यात ऊर्जा, कलात्मकता आणि कार्यक्षमता ३० टक्क्यांनी वाढते.