वजन कमी करण्यासाठी सर्वात बेस्ट मानले जाणारे २ डाएट प्लॅन, तज्ज्ञसुद्धा देतात यांचाच सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 01:26 PM2020-01-27T13:26:20+5:302020-01-27T13:26:25+5:30

वजन कमी करण्यासाठी आणि आकर्षक फिगर दिसण्यासाठी  लोकं वेगवेगळे प्रयत्न करत असतात.

Best weight Loss diet plan intermitten diet or intermittent fasting | वजन कमी करण्यासाठी सर्वात बेस्ट मानले जाणारे २ डाएट प्लॅन, तज्ज्ञसुद्धा देतात यांचाच सल्ला

वजन कमी करण्यासाठी सर्वात बेस्ट मानले जाणारे २ डाएट प्लॅन, तज्ज्ञसुद्धा देतात यांचाच सल्ला

googlenewsNext

वजन कमी करण्यासाठी आणि आकर्षक फिगर दिसण्यासाठी  लोकं वेगवेगळे प्रयत्न करत असतात. त्यासाठी  डाएट करण्यापासून  वेगवेगळे व्यायाम प्रकार केले जातात. पण योग्य माहिती नसल्यामुळे आणि अर्धवट काही गोष्टी माहित असल्यामुळे डाएट व्यवस्थीत फॉलो केलं जातं नाही. अनेकजण इंटरमिटेंट फास्टिंग, मेडिटेरियन डायट आणि पालीओ डायट अशा डाएटच्या प्रकारांचा अवलंब करतात. 

Image result for diet plan(image credit-signature market)

अलिकडे करण्यात आलेल्या अभ्यासानूसार वजन कमी करण्यासाठी कोणतं डाएट परिणामकारक ठरत असतं. याबाबत मत मांडण्यात आले. यात सहभागी असलेल्या व्यक्तींना आपला डाएट प्लॅन निवडण्याची संधी देण्यात आली होती. हा रिसर्स २५० लोकांवर करण्यात आला होता.यात ५४ टक्के  लोकांना फास्टिंग डाएट २७ टक्के मेडिटेरियन डाएट आणि १८ टक्के लोकांनी पालीओ डाएट निवडला होता.

इंटरमिटेंट फास्टिंगचे फायदे 

Image result for diet plan

या अभ्यासात एक गोष्ट उघड झाली ती म्हणजे वजन कमी करण्यासाठी  तुम्हाला इंटरमिटेंट फास्टींगचा सगळ्यात सोपा मार्ग आहे. तसंच सगळयात जास्त परिणामकारक सुद्धा आहे. यासाठी महिलांनी आपलं एनर्जी इनटेक ५०० कॅलरीज आणि पुरूषांनी ६०० कॅलरीजपर्यंत  घ्यायला हवेत. ( हे पण वाचा-वजन कमी करण्यासोबत 'या' आजारांपासून बचावासाठी फायदेशीर योगासनं)

मेडिटेरियन और पालीओ डायट

Image result for diet plan

या अभ्यासानूसार मेडिटेरेयन डाएट फॉलो करत असलेले लोकं वेटलॉस पाहिलं गेलं. यांच एव्हेरज दोन ते चार किलोंनी वजन कमी झालं होतं. त्याबरोबरच आरोग्याचा विचार करता त्यांच्या रक्तदाब आणि शुगर लेवल नियंत्रणात होतं. वजन कमी करण्यासाठी आणि आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी हा डाएटचा प्रकार फायदेशीर ठरत असतो.

Image result for diet planमाहितीसाठी आणि वजन वाढण्याची लोकांची समस्या कमी होण्यासाठी तज्ञांकडून डाएट प्लॅन संबंधीत माहिती देण्याता आली आहे. यामुळे तुम्हाला जमेल तसं कोणत्याही प्रकारे तुम्ही डाएट करू शकतात. अनेक लोकांना या डाएट प्लॅनचा वापर केल्यामुळे  फरक दिसून आला आहे. ( हे पण वाचा-रोज 'हा' पदार्थ खाल्ल्याने कमी होणार ब्रेस्ट कॅन्सरचा धोका, रिसर्चमधून दावा...)

Web Title: Best weight Loss diet plan intermitten diet or intermittent fasting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.