Health tips: गरमीत दुधासोबत मिसळून प्या 'हा' पदार्थ, वाटेल एकदम रिलॅक्स अन् थंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 15:40 IST2022-04-29T14:33:25+5:302022-04-29T15:40:06+5:30
दुध कधी गुलकंदासोबत ट्राय केलंय का? जाणून घ्या गुलकंद आणि दुध या कॉम्बिनेशचे फायदे...

Health tips: गरमीत दुधासोबत मिसळून प्या 'हा' पदार्थ, वाटेल एकदम रिलॅक्स अन् थंड
तुम्ही रोज फक्त दुध पिऊन कंटाळला असाल. जास्तीत जास्त तुम्ही त्यात साखर घालत असाल. पण तुम्ही दुध कधी गुलकंदासोबत ट्राय केलंय का? जाणून घ्या गुलकंद आणि दुध या कॉम्बिनेशचे फायदे...
स्ट्रेस होतो कमी
सध्याच्या जीवनशैलीमुळे ताणतणाव प्रचंड वाढलेला आहे. अशावेळी दुधासोबत गुलकंद मिसळून प्यायल्याने नसा शांत होतात व रिलॅक्स वाटते. त्यामुळे स्ट्रेस भरपूर प्रमाणात कमी होतो.
डोळ्यांची दृष्टी सुधारते
दुध हे आपल्या शरीरासाठी चांगलं असतंच पण गुलकंदासोबत दुध प्यायल्याने आपली दृष्टी सुधारते. दुध आणि गुलकंदाचं कॉम्बिनेश तुमच्या डोळ्यांसाठी अत्यंत चांगलं असतं.
बद्धकोष्ठता
गरम दुध तुमच्या पोटासाठी चांगले असते. पण जेव्हा तुम्ही दुधासोबत गुलकंदाचे सेवन करता तेव्हा बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. गुलकंदामधील मॅग्नेशियम पोटासाठी चांगले असते.
तोंडातील अल्सरपासून आराम
गुलकंदासोबत दुध प्याल्याने तोंडातील अल्सरपासून आराम मिळतो. तोंडातील अल्सरपासून आराम मिळण्यासाठी गर्म दुधात गुलकंद मिसळून प्या. लगेच आराम मिळेल.