काळे मिरे आणि बदाम एकत्र खाल्ल्याने होतात हे जबरदस्त फायदे, वाचून लगेच खायला कराल सुरवात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2022 18:24 IST2022-09-02T18:17:33+5:302022-09-02T18:24:54+5:30

Black Pepper And Almonds Benefits: जास्तीत जास्त लोकांना हे माहीत नाही की, बदाम आणि काळे मिरे एकत्र खाल्ले तर शरीराला कोणते मोठे फायदे मिळतात? चला जाणून घेऊ याचे फायदे....

Benefits of Eating black pepper and almonds together, you should know this | काळे मिरे आणि बदाम एकत्र खाल्ल्याने होतात हे जबरदस्त फायदे, वाचून लगेच खायला कराल सुरवात!

काळे मिरे आणि बदाम एकत्र खाल्ल्याने होतात हे जबरदस्त फायदे, वाचून लगेच खायला कराल सुरवात!

Black Pepper And Almonds Benefits: आपण नेहमीच काळे मिरे आणि बदामाचं सेवन करतो. पण दोन्हींचं सेवन वेगवेगळं केलं जातं. मात्र, बदाम आणि काळे मिरे एकत्र खाल्ल्याने आरोग्याला जास्त फायदे मिळतात असं मानलं जातं. जास्तीत जास्त लोकांना हे माहीत नाही की, बदाम आणि काळे मिरे एकत्र खाल्ले तर शरीराला कोणते मोठे फायदे मिळतात? चला जाणून घेऊ याचे फायदे....

पोटासाठी फायदेशीर

बदामात डाएट्री फायबर असतात जे पोटाला निरोगी ठेवण्यासाठी आणि पचनासाठी मदत करतात. सोबतच काळ्या मिऱ्यांमध्ये पिपेरिन नावाचं तत्व असतं जे प्रोटीनला तोडण्यात आणि सहजपणे पचवण्यात मदत करतं. हे कॉम्बिनेशन पचन चांगल्या होण्यासाटी आणि आतड्या निरोगी ठेवण्यासाठी मदत करतं. त्यामुळे तुम्ही जर रोज याचं सेवन केलं तर हे पोटासाठी फायदेशीर ठरतं.

मेंदूसाठीही फायदेशीर

हे तर सर्वांनाच माहीत आहे की, बदामला ब्रेन फूड म्हटलं जातं. कारण याने मेंदू फीट राहतो आणि आपल्या क्रिया योग्यप्रकारे करतो. तेच काळ्या मिऱ्यातील पिपेरिन चिंता आणि तणावही कमी करण्याचं काम करतं. इतकंच नाही तर जर तुम्ही याचं रोज सेवन केलं तर याने तुमचा मेंदू अॅक्टिव राहण्यास मदत मिळते.

ब्लड प्रेशर कंट्रोल राहतं

बदाम आणि काळे मिऱ्याच्या कॉम्बिनेशनने हाय ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवण्यासही मदत मिळते. याने शरीरातून बॅड कोलेस्ट्रॉल बाहेर काढण्यास मदत मिळते. ज्यामुळे हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकचा धोकाही कमी होतो.

सर्दी-खोकल्यावर रामबाण उपाय

सर्दी-खोकल्याची समस्या असेल तेव्हा बदाम आणि काळे मिऱ्याचं सेवन करणं फायदेशीर ठरतं. याने शरीरातून तयार होणारा कफही कंट्रोल केला जाऊ शकतो.

Web Title: Benefits of Eating black pepper and almonds together, you should know this