उपाशीपोटी बेलपत्र खाण्याचे फायदे वाचाल, तर देवाला वाहण्यासोबतच रोज स्वत:ही खाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 12:43 IST2025-01-02T12:38:39+5:302025-01-02T12:43:41+5:30
बेलपत्राची शरीरातील अनेक अवयव निरोगी ठेवण्यास मदत मिळते आणि त्यामुळे अनेक आजारांपासून बचावही होतो. चला तर जाणून घेऊ बेलपत्राचे फायदे...

उपाशीपोटी बेलपत्र खाण्याचे फायदे वाचाल, तर देवाला वाहण्यासोबतच रोज स्वत:ही खाल!
भगवान शिवाला बेलपत्र वाहून पूजा केली जाते. बेलपत्राला मोठं धार्मिक महत्व आहे. पण अनेकांना हे माहीत नसतं की, हे बेलपत्र आरोग्यासाठीही अनेक दृष्टीनं फायदेशीर ठरतं. बेलपत्रामध्ये असे अनेक पोषक तत्व असतात, जे शरीराला आतून मजबूत आणि निरोगी ठेवतात. आयुर्वेदातही याला एक महत्वाची औषधी मानलं आहे आणि अनेक उपचारात याचा वापर केला जातो. जर सकाळी बेलपत्र उपाशीपोटी खाल्ले तर याचे फायदे दुप्पट मिळतात. बेलपत्राची शरीरातील अनेक अवयव निरोगी ठेवण्यास मदत मिळते आणि त्यामुळे अनेक आजारांपासून बचावही होतो. चला तर जाणून घेऊ बेलपत्राचे फायदे...
१) पोटाच्या समस्या होतील दूर
जर तुम्हाला पोटासंबंधी समस्या जसे की, गॅस, अॅसिडिटी आणि अपचन होत असेल तर बेलपत्र तुमच्यासाठी फायदेशीर ठरतात. बेलपत्रामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं. जे पचनक्रिया मजबूत करतं. रोज सकाळी उपाशीपोटी बेलपत्र खाल्ल्यास पोटासंबंधी अनेक समस्या दूर करू शकता.
२) हृदयासाठी फायदेशीर
आजकाल भरपूर लोक हृदयरोगांचे शिकार होत असतात. अशात बेलपत्र हे आजार रोखण्यासाठी फायदेशीर ठरतं. यात अॅंटी-ऑक्सिडेंट्स गुण असतात, जे हृदयरोगांपासून बचाव करतात आणि हृदय मजबूत ठेवतात. नियमितपणे बेलाची पानं खाल्ल्यास हृदयासंबंधी अनेक समस्या कमी केल्या जाऊ शकतात.
३) डायबिटीस होईल कंट्रोल
डायबिटीसच्या रूग्णांसाठी बेलपत्र खाणं फायदेशीर ठरू शकतं. यातील फायबर आणि इतर पोषक तत्वामुळे ब्लड शुगर लेव्हर कंट्रोल राहण्यास मदत मिळते. बेलपत्र नियमित खाणं डायबिटीसच्या रूग्णांसाठी एक नॅचरल उपाय ठरू शकतो.
४) इम्यूनिटी वाढते
बेलपत्रामध्ये व्हिटॅमिन सी आणि अॅंटी-ऑक्सिेडंट्स भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि वेगवेगळ्या आजारांपासून शरीराचा बचाव होतो. जर तुम्हाला वेगवेगळ्या इन्फेक्शनपासून बचाव करायचा असेल आणि निरोगी रहायचं असेल तर नियमितपणे बेलाची पानं खाऊ शकता.
कसे खाल?
बेलपत्राचा समावेश आहारात करणं खूप सोपं आहे. तुम्ही ही पानं धुवून थेट अशीच खाऊ शकता किंवा याचा काढा बनवू शकता. त्याशिवाय बेलाची पानं मधात मिक्स करूनही खाऊ शकता. असं केल्यास यापासून मिळणारे फायदे अधिक मिळतील.