बदाम आणि मध एकत्र खाल्ल्यानं काय होतं वाचाल तर रोज असंच खाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 16:16 IST2025-03-12T16:11:17+5:302025-03-12T16:16:31+5:30

Almond with honey benefits : अनेकांना हे माहीत नाही की, बदाम मधासोबत खाल्ले तरी शरीराला अनेक फायदे मिळतात. या फायद्यांबाबत आज जाणून घेणार आहोत.

Benefits of eating almonds dipped in honey | बदाम आणि मध एकत्र खाल्ल्यानं काय होतं वाचाल तर रोज असंच खाल!

बदाम आणि मध एकत्र खाल्ल्यानं काय होतं वाचाल तर रोज असंच खाल!

Almond with honey benefits : बदामामध्ये भरपूर पोषक तत्व असतात. यात एनर्जी फॅट, फायबर, प्रोटीन, पोटॅशिअम, फॉस्फोरस, मॅग्नेशिअम, कॅल्शिअम, व्हिटॅमिन ई, ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड आणि आयर्न इतके पोषक तत्व असतात. जे शरीराला भरपूर फायदे देतात. सामान्यपणे जास्तीत जास्त लोक रात्री भिजवून ठेवलेले बदाम सकाळी खातात. मात्र, अनेकांना हे माहीत नाही की, बदाम मधासोबत खाल्ले तरी शरीराला अनेक फायदे मिळतात. या फायद्यांबाबत आज जाणून घेणार आहोत.

मधासोबत बदाम खाण्याचे फायदे

- मधासोबत बदाम खाल्ल्यानं पचन तंत्र मजबूत राहतं. बदाम आणि मध सोबत खाल्ल्यास केस आणि त्वचेची चमक अधिक वाढते.

- बदाम आणि मधाचं मिश्रणानं हाडं मजबूत होतात. कारण मधात व्हिटॅमिन डी भरपूर प्रमाणात असतं. तर बदामात कॅल्शिअम असतं.

- बदामामध्ये ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड आणि अ‍ॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात. हे हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत करतात. मधातील अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स तत्वामुळे हृदाय निरोगी राहतं.

- बदामातील व्हिटॅमिन सी आणि अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्सनं शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. ज्यामुळे वेगवेगळे इन्फेक्शन आणि आजारांचा धोका कमी होतो.

- बदाम आणि मधात फायबर व अ‍ॅंटी-डायबेटिक गुण असतात. ज्यामुळे डायबिटीस कंट्रोल करण्यास मदत मिळते.

उन्हाळ्यात बदाम कसे खावेत?

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बदाम भिजवून खाणं चांगलं ठरतं. बदाम रात्रभर किंवा काही तासांसाठी पाण्यात भिजवून ठेवा. याने साल काढणंही सोपं होतं. तसेच बदाम भिजवून खाल्ले तर त्यातील पोषक तत्व मिळतात. तसेच भिजवलेले बदाम पचवणं सुद्धा सोपं होतं. कच्चे बदाम खाल तर पचन तंत्रासाठी समस्या होऊ शकते. 

Web Title: Benefits of eating almonds dipped in honey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.