शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
2
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
3
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
4
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
5
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
6
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
7
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
8
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
9
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
10
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
11
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
12
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
13
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
14
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
15
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
16
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
17
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
18
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
19
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
20
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले

Health tips: स्वयंपाकघरातील 'हा' पदार्थ कॅन्सर आणि मासिक पाळीच्या आजारांवर प्रभावी, जाणून घ्या अधिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 09:20 IST

तुम्हाला माहित आहे का? हिंगाचा वापर अनेक आजारांवर पारंपारिक उपाय म्हणूनही केला जातो. जाणून घेऊया हिंगाच्या (Hing Medicinal Use) औषधीय गुणधर्मांबद्दल...

हिंग हा भारतीयांच्या स्वयंपाकघरातील एक मसाल्याचा पदार्थ आहे. हा तिखट वासाचा मसाला (Asafoetida Benefits) फेरुला वनस्पतींमधून काढलेल्या लेटेकपासून बनवला जातो. जेवणाची चव वाढवण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी डाळ आणि शाकाहारी पाककृतींमध्ये हिंग वापरले जाते. मात्र तुम्हाला माहित आहे का? हिंगाचा वापर अनेक आजारांवर पारंपारिक उपाय म्हणूनही केला जातो. जाणून घेऊया हिंगाच्या (Hing Medicinal Use) औषधीय गुणधर्मांबद्दल...

अपचनासाठी उपायशतकानुशतके हिंगाचा उपयोग पोटातील गॅस, पॉट फुगणे, आणि पेटके यावर उपाय (Remedy For Indigestion) म्हणून केला जातो. त्याचे कार्मिनिटिव्ह आणि अँटिस्पास्मोडिक गुणधर्म जास्त अ‍ॅसिड स्रावामुळे पोट फुगणे आणि पोटदुखीपासून आराम देतात. स्वयंपाक केल्यानंतर त्याची तीव्र चव आपल्या लाळेतील स्राव वाढवून भूक उत्तेजित करते आणि पचनास मदत करते. हिंगदेखील पित्त आणि इतर एन्झाईम्सचा स्राव वाढवते ज्यामुळे अन्नाचे विघटन होते.

अँटिमायक्रोबियल अ‍ॅक्टिव्हिटीहिंगामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि अँटीफंगल गुणधर्म असल्याचा (Hing Inhibit Antimicrobial Activity) पुरावा अभ्यासात आढळून आला आहे. हिंगाचा क्रूड अर्क इसरशिया कोलाय (Escherichia Coli) आणि स्टॅफिलोकॉकस ओरियस (Staphylococcus Aureus) यांची वाढ प्रतिबंधित करते. हे बॅक्टेरिया अतिसार, न्यूमोनिया, मूत्रमार्गात संक्रमण, अन्न विषबाधा, विविध त्वचा रोग, हाडे आणि सांधे यांचे संक्रमण आणि सेप्सिसचे कारण बनतात.

मूत्रपिंड संरक्षणविस्टार उंदरांवरील अभ्यासातून असे दिसून आले आहे की हिंगाचा अर्क लघवीचे प्रमाण वाढवून मूत्रपिंडाचे (Kidney Protection) कार्य सुधारते. हिंगामध्ये असलेले फिनोलिक संयुगे आणि फ्लेव्होनॉइड्स लघवीचे प्रमाण वाढवणारे औषध म्हणून कार्य करतात, ज्यामुळे अतिरिक्त क्रिएटिनिन आणि युरिया बाहेर काढण्यात मदत होते. असे परिणाम सूचित करतात की हिंगाच्या सेवनाने मानवांच्या मूत्रपिंडांना देखील फायदा होऊ शकतो.

कर्करोग विरोधीसंशोधनात असे दिसून आले आहे की उंदरांमधील ट्यूमर कमी करण्यासाठी हिंग प्रभावी (Hing Is Anti-Cancer) आहे. फुफ्फुस, यकृत, मूत्रपिंड आणि स्तनांमध्ये कर्करोगाचा प्रसार कमी करण्यासाठी हिंग प्रभावी असू शकते आणि कर्करोगामुळे कमी झालेल्या शरीराचे वजन वाढविण्यात मदत करते.

महिलांशी आजारांवर उपचारमासिक पाळीच्या समस्या, प्रसूतीविषयक गुंतागुंत, अवांछित गर्भपात आणि वंध्यत्व यासारख्या स्त्रियांच्या आरोग्याच्या समस्यांवर पारंपरिक उपाय (Hing For Women Health Problems) म्हणून हिंगाचा वापर केला जातो. बाळंतपण झाल्यानंतरदेखील स्त्रियांना हिंग दिले जाते. जे सामान्यतः बाळंतपणानंतर उद्भवणारे पाचक विकार कमी करतात.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स