मसाल्यांच्या पदार्थांमध्ये समावेश असणाऱ्या जिऱ्याचे औषधी गुण!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2018 15:41 IST2018-07-04T15:40:46+5:302018-07-04T15:41:33+5:30
भारताला मसाल्यांचा देश म्हणून ओळखले जाते. जेवण अधिक चविष्ठ बनवण्याचे काम मसाले करतात. बऱ्याचदा खाद्यपदार्थांची नावे ही मसाल्यांवरून ठेवली जातात.

मसाल्यांच्या पदार्थांमध्ये समावेश असणाऱ्या जिऱ्याचे औषधी गुण!
मुंबई - भारताला मसाल्यांचा देश म्हणून ओळखले जाते. जेवण अधिक चविष्ठ बनवण्याचे काम मसाले करतात. बऱ्याचदा खाद्यपदार्थांची नावे ही मसाल्यांवरून ठेवली जातात. या मसाल्याच्या पदार्थांमधील अत्यंत गुणकारी आणि रोजच्या वापरातील एक पदार्थ म्हणजे जिरे.
जिऱ्यामध्ये लोह, मॅग्नेशिअम, कॅल्शियम, फायबर, झिंक इत्यादी अधिक प्रमाणात असते. मेक्सिको, भारत, नार्थ अमेरिका या देशांत स्वयंपाकांत जिऱ्याचा जास्त वापर केला जातो. जिरे स्वयंपाकाची केवळ चव वाढवण्याचे काम करत नाहीत तर याचे अनेक आरोग्यदायी फायदेसुद्धा आहेत. जिऱ्याचा उपयोग औषध म्हणून केला जात आहे. जाणून घेऊयात जिऱ्याचे काही आरोग्यदायी फायदे...
- जिरे पचनक्रिया सुधरवण्यासाठी काम करते. यामुळे पोटाचे विकारही दूर होण्यास मदत होते.
- गॅस आणि वातावरही जिरे हा उत्तम उपाय आहे. जिऱ्यामुळे बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते.
- शरिरातील रक्त शुद्ध करण्याचे काम करते. तसेच शरिरातील रक्ताची कमतरताही भरून काढते.
- जिऱ्यामध्ये व्हिटॅमिन 'ई' भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे त्वचेला तजेलदार बनवण्यासाठी ते महत्त्वाची भूमिका बजावते.
- जिऱ्यामध्ये असणाऱ्या व्हिटॅमिन 'ई'मुळे त्वचेवर होणारे एजिंग मार्क्स कमी होण्यास मदत होते.
- जिऱ्यामध्ये त्वचेसंदर्भातील आजारांना ठिक करण्याचे गुण असतात. एक्जिमासारख्या आजारावर जिऱ्याचा लेप लावण्यात येतो.
- अॅसिडिटीचा त्रास सतावत असेल तरिही चिमूटङर जिरे खाल्याने आराम मिळतो
- मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठीही जिऱ्याचा उपयोग होतो.
- शरिरातील अनावश्यक चरबी शरिराबाहेर टाकण्यासाठी जिऱ्याचा उपयोग होतो.
- हाताला घाम येत असल्यास जीरे पाण्यात उकळवावे आणि ते पाणी थंड करून तहान लागल्यावर प्यावे.