bed availability live tracker : Mumbai corona patients bed availability live tracker link | Bed availability live tracker : बेड शोधण्यासाठी तुमचीही होऊ शकते धावपळ;  एका क्लिकवर मिळवा बेड मिळवण्याबाबत संपूर्ण माहिती

Bed availability live tracker : बेड शोधण्यासाठी तुमचीही होऊ शकते धावपळ;  एका क्लिकवर मिळवा बेड मिळवण्याबाबत संपूर्ण माहिती

राज्यात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची स्थिती  खूपच गंभीर आहे.  रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध नसल्याचं दिसून येत आहे. मोठ्या संख्येने सापडणाऱ्या या रुग्णांना बेड (Availability of Bed For Corona Patients) मिळणे कठीण झालं आहे.

अचानक रुग्णाची स्थिती गंभीर झाली तर काय करायचं? कोणाची मदत मागायची? बेड कधी, कुठे मिळणार असे प्रश्न लोकांसमोर असतात. आता मुंबईतील प्रशासनाने रुग्णालयातील बेडची उपलब्धता घरबसल्या तपासण्यासाठी एक लिंक तयार केली आहे. ज्याद्वारे आपल्याला नेमका कोणत्या रुग्णालयात बेड उपलब्ध आहे, याची माहिती मिळेल.

बृहन्मुंबई महानगरपालिकेने शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सादरीकरणात सांगितले की, येत्या आठवड्यात शहरातील जवळपास दिडशेपेक्षा जास्त रुग्णालयांमधील बेडची संख्या सध्याच्या २०५०४ बेडवरून २२००० करण्यात येईल, तर सध्या ४१२२ बेड उपलब्ध असल्याची माहिती दिली. महापालिका प्रशासनाकडून रुग्णांना डॉक्टरांच्या नियमित देखरेखीखाली जंबो कोरोना केंद्रामध्ये दाखल करण्याचे आवाहन केले आहे. 

वैद्यकीय प्रयोगशाळांनाही 24 तासात कोरोना चाचणी रिपोर्ट जाहीर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय >> https://mumgis.mcgm.gov.in/Resources/COVIDBeds/bedTracker.html.<< दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपण माहिती खाटांची माहिती घेऊ शकतो. ही लिंक दर 2 तासांनी अपडेट केली जात असते.

या २ कारणांमुळे वेगानं होतोय कोरोनाचा प्रसार; AIIMS च्या संचालकांनी सांगितली मोठी कारणं

दरम्यान गेल्या २४ तासात मुंबईत ८ हजार ८३४ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ५ लाख ७० हजार ८३२ झाली आहे. सध्या ८७ हजार ३६९ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर एकाच दिवसात ५२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. वाढत्या कोरोनाबाधित रुग्णांप्रमाणे मृतांचा आकडाही वाढतो आहे.आतापर्यंत कोरोनामुळे १२ हजार २९४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाबाधितांची संख्या जरी वाढत असली तरी मुंबईत दिवसभरात कोरोनावर ६ हजार ६१७ रुग्णांनी मात केली आहे. 

पॉझिटिव्ह आल्यापासून उपचारांपर्यंत; लवकर बरं होण्यासाठी कोरोनाबाबत या गोष्टी माहीत करून घ्या

आतापर्यंत एकूण ४ लाख ६९ हजार ९६१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यानुसार मुंबईत कोरोना रुग्णांचा बरे होण्याचा दर हा ८२ टक्के आहे. मुंबईत एकूण ४७ हजार २५३ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत एकूण ४ कोटी ८ लाख ९९ हजार ५ कोरोना चाचण्या करण्यास दिल्या आहेत. १० ते १६ एप्रिलपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर १.५७ टक्के असल्याची नोंद आहे. तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ४४ दिवसांवर गेला आहे. 
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: bed availability live tracker : Mumbai corona patients bed availability live tracker link

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.