शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
2
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
3
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
4
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
5
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
6
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
7
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
8
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
9
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
10
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
11
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
12
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
13
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
14
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
15
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
16
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
17
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
18
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
19
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
20
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर

रक्ताची कमतरता भरुन काढते हे फुल, 'अशापद्धतीने' करा उपयोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2022 13:33 IST

जाणून घेऊया अशा आणखी एका गोष्टीबद्दल, ज्याद्वारे शरीरातील रक्ताची कमतरता (Banana Flower benefit) भरून काढता येते.

रक्ताच्या कमतरतेमुळे शरीरात अनेक प्रकारचे बदल होऊ लागतात. अशा स्थितीत वेळीच उपचार करून घ्यावेत, अन्यथा नंतर त्रास वाढू शकतो. अॅनिमिया झाल्यास डाळिंब आणि बीटरूट खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, काही लोकांच्या समस्या एवढ्यावरच संपत नाहीत आणि त्यांना औषधांचा आधार घ्यावा लागतो. अशी परिस्थिती टाळण्यासाठी आणखी एक नैसर्गिक उपाय घेऊन आहे, ज्यामुळे रक्ताची कमतरता सहज भरून काढता येईल. जाणून घेऊया अशा आणखी एका गोष्टीबद्दल, ज्याद्वारे शरीरातील रक्ताची कमतरता (Banana Flower benefit) भरून काढता येते.

केळीच्या फुलाचा फायदा होईल -झीन्यूजने दिलेल्या बातमीनुसार,  केळीच्या फुलामध्ये (केळफूल) अनेक प्रकारचे पोषक तत्व आढळतात. त्यात भरपूर जीवनसत्त्वे आणि प्रथिने असतात. त्यामुळे अॅनिमिया, डायबिटीज, इन्फेक्शन कमी करणे आणि जास्त रक्तस्राव आणि पीरियड्स दरम्यान होणाऱ्या वेदनांपासूनही आराम मिळतो.

केळीचे फूल कसे खातात -केळीच्या फुलाचे योग्य प्रकार सेवन कसे करायचे याचा विचार तुम्ही करत असाल. तुम्ही केळ फुलांचा काढा बनवून पिऊ शकता. याचा फायदा तुम्हाला मिळेल. यासाठी आपल्याला केळ फूल एक ग्लास पाण्यात उकळावे लागेल, टेस्टसाठी तुम्ही त्यात थोडे मीठ टाकू शकता. गरम झाल्यावर गॅसवरून उतरवा. यानंतर, थंड झाल्यावर, आपण काळी मिरी आणि अर्धा चमचा जिरे पूड देखील घालू शकता. आता हे मिश्रण पुन्हा शिजवण्यासाठी गॅसवर ठेवा. शिजवल्यानंतर तुमचा केळफुलाचा काढा तयार होईल. थंड झाल्यावर त्यात दही घालून खाऊ शकता.

केळफुलात अनेक आयुर्वेदिक गुणधर्म असतात. केळफुलात प्रामुख्यानं फायबर, प्रथिनं, पोटॅशिअम, कॅल्शियम, तांबं, फॉस्फरस, लोह, मॅग्नेशियम आणि ई जीवनसत्त्वं असतात.

आयुर्वेदात केळाच्या फुलाचा काढा करुन मधुमेह असलेल्यांना पिण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे इन्शुलिनची पातळी कमी होते. रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी केळफुलाची भाजी खाण्याचाही सल्ला दिला जातो. केळफुलात असलेल्या पोषक तत्त्वांमुळे आणि त्यातील फायबरमुळे वजन कमी करण्यातही या फुलाची मदत होते. वजन कमी करण्यासाठी केळाच्या फुलाचा उपयोग सूप किंवा कोशिंबीरीत करण्याचा सल्ला दिला जातो.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स