शरीरासाठी दारूपेक्षाही जास्त घातक आहे तुमची ही सवय, जीवाला होतो धोका!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2023 10:43 AM2023-11-01T10:43:41+5:302023-11-01T10:44:14+5:30

या वाईट सवयीमुळे डायबिटीस, हार्ट अटॅक, स्ट्रोक, हय बीपी, कॅंसरही होऊ शकतो. त्यामुळे ही सवय लगेच बदलण्याचा प्रयत्न करा.

Bad habit which is more harmful than drinking alcohol and reduce your life expectancy | शरीरासाठी दारूपेक्षाही जास्त घातक आहे तुमची ही सवय, जीवाला होतो धोका!

शरीरासाठी दारूपेक्षाही जास्त घातक आहे तुमची ही सवय, जीवाला होतो धोका!

बऱ्याच लोकांना असं वाटतं की, शरीरासाठी दारूपेक्षा जास्त घातक दुसरं काही नाही. पण असं विचार करणं चुकीचं आहे. सामान्य दिसणारी तुमची एक सवय तुमचं 100 वर्ष जगण्याचं स्वप्न धुळीस मिळवू शकते. या वाईट सवयीमुळे डायबिटीस, हार्ट अटॅक, स्ट्रोक, हाय बीपी, कॅंसरही होऊ शकतो. त्यामुळे ही सवय लगेच बदलण्याचा प्रयत्न करा.

ब्रिटिश जर्नल ऑफ स्पोर्ट्स मेडिसिनमध्ये ऑनलाइन प्रकाशित एका रिसर्चच्या हवाल्याने सांगण्यात आलं आहे की,  सुस्त लाइफस्टाईलमुळे व्यक्तीच्या मृत्युचा धोका वाढू शकतो. रिसर्च फार बारकाईने करण्यात आला आहे. ज्यामुळे याच्या निष्कर्षांना हलक्यात घेऊ शकत नाही. 

9 ते 10 तास बसण्याची सवय किंवा मजबूरी

आजकाल लोकांना ऑफिसमध्ये तासंतास बसून काम करावं लागतं. सरासरी एक कर्मचारी दिवसातून 9 ते 10 तास बसून राहतो. काही लोकांना शारीरिक हालचाल न करण्याची सवयच असते आणि ते दिवसभर बेडवर किंवा सोफ्यावर पडून असतात. रिसर्चमध्ये अशा सुस्त लाइफस्टाईल असलेल्या लोकांना लवकर मृत्युचा धोका असल्याचं सांगण्यात आलं आहे. 

या रिसर्चमध्ये विकसित देशातील 50 वयाच्या जवळपास 12 हजार व्यक्तींच्या मेडिकल रेकॉर्डचा समावेश होता. या सहभागी लोकांनी कमीत कमी 2 वर्ष आठवड्यातून कमीत कमी चार दिवस एक फिजिकल अॅक्टिविटी डिवाइसचा वापर करायचा होता. दररोज त्यांना सरासरी 10 तास ते लावून ठेवायचं होतं. ज्याच्या द्वारे समजलं की, एक काम करणारी व्यक्ती दररोज जवळपास 9 ते 10 तास बसते किंवा इतर लोक इतकेच तास इनअॅक्टिव राहतात.

रिझल्टने केलं हैराण

अभ्यासकांना आढळलं की, 5 वर्षाच्या फॉलोअपमध्ये जे सहभागी 12 तासांपेक्षा जास्त वेळ बसून होते, त्यांच्यातील 7 टक्के लोकांचा मृत्यू झाला. हा धोका 12 तास बसणाऱ्या आणि दररोज 22 मिनिटांपेक्षाही कमी फिजिकल अॅक्टिविटी करणाऱ्या सहभागी लोकांना जास्त होता. तेच जे लोक दिवसातून कमीत कमी 22 मिनिटे फिजिकल अॅक्टिविटी करत होते, त्यांना लवकर मृत्युचा धोका कमी होता.

अभ्यासकांचा सल्ला

जास्त वेळ बसून राहिल्याने होणाऱ्या समस्या कमी करण्यासाठी कमीत कमी 22 मिनिटे एक्सरसाइज करावी. याने लवकर मृत्युचा धोका कमी होतो. तुम्ही एक्सरसाइज रूटीन तुमच्या लाइफस्टाईलनुसार आठवड्यात विभागू शकता. तुम्ही रोज सायकलिंग, रेजिस्टेंस ट्रेनिंग आणि गार्डनिंग करूनही धोका कमी करू शकता.

10 मिनिटांच्या एक्सरसाइजनेही होतो फायदा

तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही केवळ 10 मिनिटेही एक्सरसाइज करू शकता. रिसर्चमध्ये आढळलं की, दररोज 10 मिनिटे इंटेंस एक्सरसाइज करून 35 टक्के मृत्युचा धोका कमी करू शकता.

Web Title: Bad habit which is more harmful than drinking alcohol and reduce your life expectancy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.