दात स्वच्छ करूनही तोंडाची दुर्गंधी येते का? ही कारणे असू शकतात जबाबदार...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2024 14:27 IST2024-01-10T14:26:32+5:302024-01-10T14:27:00+5:30
Bad breath cause : तज्ज्ञांनुसार, सतत तोंडाची दुर्गंधी येत असेल तर टाइप २ डायबिटीस, लंग्स, लिव्हर आणि किडनी संबंधी आजार असण्याचेही संकेत आहेत.

दात स्वच्छ करूनही तोंडाची दुर्गंधी येते का? ही कारणे असू शकतात जबाबदार...
Bad breath cause : तुम्ही ब्रश करूनही तुमच्या तोंडाची दुर्गंधी येत असेल तर वेळीच याबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे. तज्ज्ञांनुसार, सतत तोंडाची दुर्गंधी येत असेल तर टाइप 2 डायबिटीस, लंग्स, लिव्हर आणि किडनी संबंधी आजार असण्याचेही संकेत आहेत.
लंग्स इन्फेक्शनमुळेही अनेकदा सतत तोंडाची दुर्गंधी येऊ शकते. त्यामुळे वेळीच टेस्ट करावी. लिव्हर इन्फेक्शनमुळे इनडायजेशनची समस्या होऊ लागते. अशात तोंडाची दुर्गंधी येऊ लागते.
टाइप - 2 डायबिटीस झाल्यावर शरीरात ग्लूकोजचं प्रमाण कमी होत असल्याने तहान जास्त लागते. तोंड कोरडं पडू लागतं. सोबतच शरीरात मेटाबॉलिज्म बदल होऊ लागतात. त्यामुळेही तोंडाची दुर्गंधी येते.
किडनी डिजीजमुळे शरीरात मेटाबॉलिक बदल होऊ लागतो. त्यामुळे तोडांची दुर्गंधी येऊ लागते.
हिरड्यांच्या काही समस्या असेल तर पेरिओडोन्टिक नावाचा आझार होतो. यानेही तोंडाची दुर्गंधी येऊ लागते.
लाळ आपल्या तोडांला स्वच्छ ठेवते. पण जेव्हा लाळ कमी तयार होते तेव्हा जेरोस्टोमिया किंवा तोंड कोरडं पडण्याची समस्या होऊ लागते.
आपल्या लाळेत अॅंटी-बॅक्टेरिअल गुण असतात. ज्यामुळे तोंडात बॅक्टेरिया जास्त होतात. पण तोंड कोरडं पडत असेल आणि लाळ पुरेशी तयार होत नसेल तर बॅक्टेरियाचं प्रमाण वाढू लागतं आणि तोंडाची दुर्गंधी येऊ लागते.