पाठ आणि कंबरदुखीची मुख्य कारणं जाणून घ्याल तेव्हाच योग्य उपाय करू शकाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2019 10:32 IST2019-10-04T10:20:13+5:302019-10-04T10:32:00+5:30
खराब आणि गती नसलेली लाइफस्टाईल पाठदुखी आणि कंबरदुखीचं मुख्य कारण आहे. याने होणाऱ्या वेदनेमुळे उठण्या-बसण्यात, झोपण्यात आणि इतरही कामे करण्यात अडचण निर्माण होते.

पाठ आणि कंबरदुखीची मुख्य कारणं जाणून घ्याल तेव्हाच योग्य उपाय करू शकाल!
(Image Credit : healthline.com)
खराब आणि गती नसलेली लाइफस्टाईल पाठदुखी आणि कंबरदुखीचं मुख्य कारण आहे. याने होणाऱ्या वेदनेमुळे उठण्या-बसण्यात, झोपण्यात आणि इतरही कामे करण्यात अडचण निर्माण होते. सामान्यपणे लोक पाठीच्या हलक्या दुखण्याकडे दुर्लक्ष करतात. कारण त्यांना वाटत असतं की, जास्त काम केल्याने किंवा चुकीच्या पद्धतीने बसल्याने हे होत असेल. पाठ आणि कंबर दुखण्याची वेगवेगळी कारणे असू शकतात. जसे की, जखम होणे किंवा आरोग्यासंबंधी काही समस्या. याचं एक मुख्य कारण म्हणजे पाठीचा कणा कमजोर असणे. आपल्या रोजच्या अनेक चुकांमुळे पाठीचा कणा कमजोर होतो. जर तुम्हाला या रोजच्या सवयी माहीत असतील तर पाठीच्या कण्याचा योग्य काळजी घेऊ शकाल.
जास्त वेळ एकाच ठिकाणी बसून राहणे
जास्तीत जास्त वेळ एकाच ठिकाणी बसून राहिल्याने पाठीच्या मणक्यावर अधिक दबाव पडतो. त्यामुळे जर तुम्ही जास्त वेळ एकाच ठिकाणावर बसून राहत असाल तर तुम्हाला कंबरदुखी होण्याची शक्यता असते. जास्त वेळ एकाच जागेवर बसून राहण्याऐवजी दर एक तासाने ५ मिनिटे फिरावे. जेणेकरून मांसपेशींमध्ये रक्तसंचार चांगला होईल.
तणावामुळे
जास्त तणावामुळेही पाठीचा कणा कमजोर होण्याचं एक मोठं कारण आहे. जेव्हा तुम्ही तणावात असता तेव्हा तुमच्या मानेवर आणि पाठीच्या अनेक मांसपेशींवर अनावश्यक दबाव पडतो. जर तुम्ही सतत तणावात राहत असाल तर मांसपेशी आणखी टणक होता आणि याने पाठीचा कणा कमजोर होतो.
गादी किंवा बेडमुळेही समस्या
तुमचा पाठीचा कणा दुखण्याचं एक मुख्य कारण म्हणजे बेड किंवा तुम्ही ज्या गादीवर झोपता, ती गादीही असू शकतं. तुम्हाला दर ५ ते ७ वर्षात गादी बदलावी लागेल. कारण इतक्या वर्षात गाद्या खराब होतात. त्या सैल होतात. त्यामुळे झोपतेवेळी शरीर योग्य पोश्चरमध्ये राहत नाही.
हील्समुळे
हील्स हे सुद्धा पाठ आणि कंबरदुखीचं एक कारण असू शकतं. हाय-हील्स सॅंडल घातल्याने तुमच्या पायांच्या मांसपेशींवर दबाव पडतो. आणि त्यामुळे पाठ आणि कंबरेत वेदना होऊ लागतात. त्यामुळे हलक्या सॅंडल वापराव्या आणि हील्स जास्त लांब असू नये.
अधिक धुम्रपान
सिगारेटमुळे आरोग्याबाबत वेगवेगळ्या समस्या तर होतातच सोबतच पाठीचा कणाही कमजोर होण्याचं हे एक मुख्य कारण आहे. निकोटीनमुळे ऑक्सिजनचा प्रवाह शरीरात योग्य राहत नाही. ऑक्सिजनशिवाय पाठीचा कणा स्वत:ला सक्षम करू शकत नाही.