लहान मुलांना काय खायला द्यावे किंवा काय देऊ नये. ह्या गोष्टी समजण्यासाठी कठीण असतात. लहान मुलांना साखर आणि मीठ असलेले पदार्थ कधी खायला द्यायचे आणि कधी खायला द्यायचे नाही हे न्यू मदर्सना फारसे माहीत नसतं. तज्ञांच्यामते लहान मुलांना हळूहळू सगळं खाण्याची सवय लावायला हवी. पण लहान मुलांना सगळा आहार सुरू करण्याची नेमकी वेळ कोणती जाणून घ्या.
पीडियाट्रिशियन्सच्यामते लहान मुलांना साखरेचा आहार खायला देणं खूप घातक असतं. जेव्हा मुलाचे वय २ वर्षापेक्षा जास्त होते. त्यावेळी तुम्ही साखर खायला देऊ शकता. त्या आधी खायला दिल्यास त्यांना कॅविटीज होण्याची शक्यता असते. या वयात असतांना मुलांना साखरेच्या ऐवजी खजूर खायला द्यायला हवेत.
साखरेत कॅलरिज सुद्दा मोठ्या प्रमाणात असतात. जर जास्त प्रमाणात साखरेचं सेवन केल्यास स्थूलता वाढण्याचा धोका लहानपणापासूनच असतो. त्यामुळे सुस्ती येणं , दातांना कीड लागणं अशा समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणूनच मुलांना कमीतकमी २ वर्षांचे होईपर्यंत साखर खायला देऊ नये.
तज्ञांच्या सल्ल्यानुसार लहान मुलांना एक वर्ष पुर्ण झाल्यानंतर आहारात मीठाचा समावेश करण्यास हरकत नाही. कारण लहान मुलांच्या किडन्या या पूर्णपणे परिवक्व नसतात. त्यामुळे मीठामुळे किडन्याचे कार्य सुरळीत चालू राहण्यास मदत होते. लहान मुलांना डिहायड्रेशन तसंच पोट फुगण्याची समस्या होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे मुल १ वर्षाचं होईपर्यंत त्याच्या आहारात मीठाचा समावेश न करणं फायदेशीर ठरंत. मुलांना मीठ नसलेला आहार दिल्यास आजारपणांपासून दूर राहता येईल.