शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मतदानाचा उत्साह कायम
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
5
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
6
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
7
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
8
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
9
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
10
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
11
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
12
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
13
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
14
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
15
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
16
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
17
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
18
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
19
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
20
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...

दुधीच्या रसाचे धोके सांगतेय खुद्द ताहिरा कश्यप म्हणजेच आयुष्मान खुरानाची पत्नी, शेअर केला व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 4:42 PM

आयुष्मान खुरानाची पत्नी ताहिराने तिच्या चाहत्यांसाठी दुधी भोपळ्याबद्दल जागृती करणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या सर्व प्रकरणानंतर सामान्य नागरिकांच्या मनात देखील अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे दुधी भोपळा जीवघेणा ठरण्याआधीच तो कसा ओळखायचा याविषयी जाणून घेणार आहे.

अभिनेता आयुष्मान खुरानाची (Ayushyaman Khurana) पत्नी(Wife) ताहिरा कश्यपला(Tahira Kashyap) फूड पॉयझींनीग झाल्यामुळे नुकतंच आयसीयु ICU मध्ये दाखल करण्यात आलं होतं. ताहिराला दुधी भोपळ्यामुळे फूड पॉयझींनिंग झालं होतं. ताहिराने देखील वेळेत उपचार घेतल्याने ती आता ठणठणीत आहे. यानंतर आता ताहिराने तिच्या चाहत्यांसाठी दुधी भोपळ्याबद्दल जागृती करणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या सर्व प्रकरणानंतर सामान्य नागरिकांच्या मनात देखील अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे दुधी भोपळा जीवघेणा ठरण्याआधीच तो कसा ओळखायचा याविषयी जाणून घेणार आहे.

दुधी भोपळ खाण्यायोग्य की आयोग्य कसा ओळखायचा ?दुधी, काकडी, भोपळा अशा भाज्यांचा आहारात थेट समावेश करण्यापूर्वी त्याचा लहानसा तुकडा चावून बघणे गरजेचे आहे. भाजीचा तुकडा कडवट चवीचा जाणवल्यास त्याचा आहारात समावेश करणं टाळा. वरून भोपळा ओळखणे शक्य नसते त्यावेळी हा उपाय चांगला आहे. तसेच प्रामुख्याने दूधी भोपळ्यासारख्या फळभाज्या नीट शिजवून खाणंच आरोग्याला अधिक फायदेशीर आहेत. यासोबत बाजारात मिळणारा विकतचा रस पिणं टाळा कारण तो कधी बनवला आहे याची माहिती नसते. त्याऐवजी घरच्या घरी ताजा रस बनवून प्यावा. मात्र हे सर्व करण्यापूर्वी चव तपासून पाहायला विसरू नका.

विषारी दुधी भोपळ्याची लक्षणे काय आहेत ?विषारी दुधी भोपळ्याचा रस पोटात गेल्यास अवघ्या काही मिनिटात उलटी, डायरीया, खूप प्रमाणात घाम येणे, अस्वस्थ वाटणं अशी लक्षणं आढळतात. या लक्षणांनंतर रूग्णाला तात्काळ वैद्यकीय मदत मिळणं गरजेचे आहे. अशाप्रकारच्या विषारी घटकांच्या उतारावर ठोस औषध नसल्याने जगभरात अशाप्रकारे विषारी घटक पोटात जाणं हे काही मिनिटात जीववर बेतण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे रूग्णालयात वेळेत जाणे व डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

दुधी भोपळ्याचा रस कधी ठरतो घातक आणि कशामुळे?प्रत्येक दुधी भोपळ्याचा रस हा जीवघेणा नसतो. मात्र दुधी ही फळभाजी Cucurbitaceae प्रकारातील असते. जेव्हा फळभाजीमध्ये cucurbitacin हे विषारी द्रव्य वाढते तेव्हा त्याची चव बदलते. कडवट बीयांमुळेही हे फळ कडू होते. अशाप्रकारची भाजी थेट शरीरात गेल्यास आरोग्याला धोका निर्माण होतो. दुधीप्रमाणेच या वर्गतील इतर फळभांज्याच्या बाबतीत देखील हे घडू शकते. त्यामुळे या फळभाजीपैकी कोणतेही भाजी घेताना त्याची चव घेणे गरजेचे आहे.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स