'या' औषधी वनस्पती हाय ब्लड प्रेशरच्या समस्येवर रामबाण! त्रासापासून मिळेल कायमची मुक्तता

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 05:21 PM2021-09-30T17:21:33+5:302021-09-30T17:25:41+5:30

निरोगी जीवनशैली, औषधे आणि आयुर्वेदिक औषधी वनस्पती घेऊन आपण उच्च रक्तदाबाची समस्या काही प्रमाणा कमी करू शकतो. उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी आपण कोणत्या औषधी वनस्पती वापरू शकता ते जाणून घेऊया.

ayurvedic herbs beneficial for high blood pressure problem | 'या' औषधी वनस्पती हाय ब्लड प्रेशरच्या समस्येवर रामबाण! त्रासापासून मिळेल कायमची मुक्तता

'या' औषधी वनस्पती हाय ब्लड प्रेशरच्या समस्येवर रामबाण! त्रासापासून मिळेल कायमची मुक्तता

Next

सध्या हृदयविकाराच्या आजाराने गंभीर स्वरूप धारण केले आहे. हृदयरोग जगभरात मृत्यूचे प्रमुख कारण बनत आहे. असे होण्याची अनेक कारणे आहेत. ज्यात उच्च रक्तदाब हे देखील एक मोठे कारण आहे. गेल्या दशकात या आजाराने ग्रस्त लोकांची संख्या लक्षणीय वाढली आहे.

बऱ्याच काळापासून या समस्येमुळे स्ट्रोक आणि मूत्रपिंड खराब होण्याचा धोका वाढलेला आहे. निरोगी जीवनशैली, औषधे आणि आयुर्वेदिक औषधी वनस्पती घेऊन आपण उच्च रक्तदाबाची समस्या काही प्रमाणा कमी करू शकतो. उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी आपण कोणत्या औषधी वनस्पती वापरू शकता ते जाणून घेऊया.

आवळा
रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी आवळा एक चांगले औषध आहे. त्यात व्हिटॅमिन सी असते. जे रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करते. जर तुम्ही रोज सकाळी रिकाम्या पोटी आवळ्याचा रस प्यायलात तर ते उच्च रक्तदाब आणि इतर आजारांवर नियंत्रण ठेवते.

गोटू कोला
गोटू कोला प्राचीन काळापासून औषध म्हणून वापरले जात आहे. कमी प्रमाणात घेतलेली ही कडू औषधी रक्त परिसंचरण आणि रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर आहे.

अश्वगंधा
अश्वगंधा ही एक नैसर्गिक औषधी वनस्पती आहे. आपण आपल्या संध्याकाळच्या चहामध्ये ते मिक्स करून आपल्या आहारामध्ये समाविष्ट करू शकता. अभ्यासानुसार, अश्वगंधा रक्तदाब नियंत्रित करते आणि रक्तातील साखरेची पातळी कमी करते.

लसूण
लसूण रक्तदाब कमी करण्यास मदत करते. हे कोलेस्टेरॉलची पातळी कमी करते. तुम्ही दररोज सकाळी लसणाचे सेवन करू शकता. याचे सेवन करण्याचे इतर अनेक आरोग्य फायदे देखील आहेत.

मध
जर तुम्ही रोज सकाळी कोमट पाण्याबरोबर दोन चमचे मध सेवन केले तर ते तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. रक्तदाब पातळी नियंत्रित करण्यासाठी मध हा एक उत्तम उपाय आहे.

तुळस
तुळशीला धार्मिक आणि आयुर्वेदिक दोन्ही महत्त्व आहे. तुळशीच्या चवदार हिरव्या पानांमध्ये खूप शक्तिशाली घटक असतात. ते रक्तदाब, सर्दी, फ्लू, संधिवात आणि आरोग्याशी संबंधित इतर अनेक समस्यांवर उपाय करतात. तुळशीच्या पानांमध्ये युजेनॉल असते. हे उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी ओळखले जाते. तुळशीचा चहा पिणे आणि कच्ची तुळशीची पाने खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

Web Title: ayurvedic herbs beneficial for high blood pressure problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.