दारूनं खराब झालेलं लिव्हर पुन्हा जागेवर आणण्याचा उपाय, आयुर्वेदाने मिळेल नवं जीवन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 14:09 IST2024-12-25T14:08:34+5:302024-12-25T14:09:19+5:30
वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनायजेशनने आधीच इशारा दिला आहे की, अल्कोहोलचा एक थेंबही अनेक प्रकारच्या कॅन्सरचं कारण ठरू शकतो.

दारूनं खराब झालेलं लिव्हर पुन्हा जागेवर आणण्याचा उपाय, आयुर्वेदाने मिळेल नवं जीवन!
मद्यसेवन करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पुरूषांसोबतच महिलाही मद्यसेवन अधिक प्रमाणात करू लागल्या आहेत. उत्सव आणि सुट्ट्यांदरम्यान दारूची भरपूर विक्री केली जाते. मात्र, वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनायजेशनने आधीच इशारा दिला आहे की, अल्कोहोलचा एक थेंबही अनेक प्रकारच्या कॅन्सरचं कारण ठरू शकतो.
अल्कोहोलिक फॅटी लिव्हर, लिव्हर डॅमेज आणि लिव्हर सिरोसिस दारूच्या सेवनामुळे होणारे आजार आहेत. या समस्या इतक्या गंभीर असतात की, यामुळे लिव्हर ट्रान्सप्लांट करण्याची देखील वेळ येऊ शकते.
दारूचा एक थेंबही लिव्हरचं नुकसान करतो. जेवढे जास्त दिवस दारू प्याल लिव्हरचं तेवढं जास्त नुकसान होतं. मात्र, या समस्या आयुर्वेदाच्या मदतीने कमी केल्या जाऊ शकतात. आयुर्वेदिक एक्सपर्ट डॉ. तन्मय गोस्वामी यांनी यावर एक उपाय सांगितला आहे.
साहित्य
10 ग्रॅम खजूर
10 ग्रॅम मनुके
कोकम 10 ग्रॅम
चिंच 2 ग्रॅम
डाळिंबाचे दाणे 10 ग्रॅम
आवळा पावडर 10 ग्रॅम
वर सांगण्यात आलेल्या सगळ्या गोष्टी चांगल्या बारीक करा. जेव्हा याची पेस्ट तयार होईल तर अर्धा लीटर पाण्यात टाकून चांगलं मिक्स करा. याचा ज्यूस तयार होईल. हा ज्यूस दिवसभर ५०-५० मिली अशाप्रकारे प्यावा. ३ दिवसात लिव्हर डॅमेजचा धोका कमी होऊ लागतो.
लिव्हरचं कमी होईल नुकसान
दारूला मेटाबॉलाइज करण्याचं काम लिव्हर करतं. त्यानंतर एसीटॅल्डिहाइड नावाचं एक बाय प्रोडक्ट तयार होतं. जे लिव्हरला खराब करण्याचं काम करतं. हा आयुर्वेदिक उपाय त्याच बाय प्रोडक्टला कमी करण्याचं काम करतो.